Sangli Market : हळदीचा पिवळसरपणा वाढला, सांगली बाजारपेठेत मिरचीच्या आवकमध्ये घट

हिंगोली पाठोपाठ सांगली येथे हळदीची मोठी बाजारपेठ आहे. सौदर्य प्रसाधने बनवण्यासाठी येथील बाजारपेठेतून हळद खरेदीसाठी हैदराबाद येथून व्यापारी दाखल होतात. यंदा हळद उत्पादनात घट होऊन देखील हंगामाच्या सुरवातीला आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात परपेठ हळदीची आवक 4 हजार 992 क्विंटल आवक झाली होती. हळदीला किमान दर 5 हजार तर कमाल दर 7 हजार 675 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.

Sangli Market : हळदीचा पिवळसरपणा वाढला, सांगली बाजारपेठेत मिरचीच्या आवकमध्ये घट
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 4:41 PM

सांगली :  (Sangli Market) सांगलीची बाजारपेठ ही (Turmeric) हळद खरेदी -विक्री आणि बेदाणा निर्मितीच्या अनुशंगाने महत्वाची मानली जाते. द्राक्ष हंगाम संपला असून जे द्राक्षातून उत्पादन वाढले नाही ते आता (Raisins) बेदाण्यातून मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्यतंरी ऊन-वाऱ्याचा सामना करून बेदाणा मार्केटमध्ये वाढत आहे. दरही सरासरीप्रमाणे द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधानी आहे. तर दुसरीकडे हळदीच्या आवकमध्येही वाढ होत आहे. आवक वाढूनही हळदीचे दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मार्केट यार्डात परपेड हळदीची आवक वाढली आहे. गूळ आणि मिरचीची आवक मात्र घटली असून याच्या किंमतीमध्येही वाढ झालेली नाही. सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत शेतीमालाची आवक कमी – अधिक प्रमाणात असली तरी दरामध्ये अधिकची तफावत झालेली नाही.

हळदीची परजिल्ह्यातूनही आवक

हिंगोली पाठोपाठ सांगली येथे हळदीची मोठी बाजारपेठ आहे. सौदर्य प्रसाधने बनवण्यासाठी येथील बाजारपेठेतून हळद खरेदीसाठी हैदराबाद येथून व्यापारी दाखल होतात. यंदा हळद उत्पादनात घट होऊन देखील हंगामाच्या सुरवातीला आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात परपेठ हळदीची आवक 4 हजार 992 क्विंटल आवक झाली होती. हळदीला किमान दर 5 हजार तर कमाल दर 7 हजार 675 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. राजपुरी हळदीची 14 हजार 353 क्विंटल आवक झाली आहे. किमान दर 6 हजार तर कमाल दर 10 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.

मिरचीला मागणी मात्र आवकमध्ये घट

वाढत्या उन्हामुळे मिरचीला अधिकची मागणी होत आहे. मिरचीपासून जे पदार्थ बनवले जातात त्यामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. तर दुसरीकडे उत्पादनात घट झाल्याने आवकवरही त्याचा परिणाम झाला आहे. या आठवड्यात 300 क्विंटल आवक झाली आहे. गेल्या आठवड्या पेक्षा 140 क्विंटल ने आवक कमी झाली आहे. तर मिरचीला दर हा 20 हजार सातशे ते 23 हजार पाचशे रुपये क्विंटल इतका मिळत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम उत्पादनावर झाल्याने आता आवक घटली आहे. त्यामुळे भविष्यात वाळलेल्या मिरचीचे दर वाढतील असा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

द्राक्षामध्ये नुकसान, बेदाण्यातून भरपाई

वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाला अपेक्षित दर तर मिळालाच नाही पण विक्रीविना द्राक्ष पडून होती. त्यामुळे उत्पादकांनी मध्यंतरी द्राक्षाचे बेदाणे तयार करुन घेतले असून आता बाजारपेठेत आवक वाढली आहे. बेदाण्याची आवक वाढतच आहे. बेदाण्याची 12 हजार 317 क्विंटल आवक झाली आहे. बेदाण्याला प्रति क्विंटल किमान 4 हजार रुपये तर कमाल दर 20 हजार 300 रुपये मिळत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.