Rice Export : बासमती तांदळाचा सुगंधही दरवळला अन् दरही वाढला, काय आहेत कारणे?

नाही म्हणलं तरी शेतीमालाच्या निर्यातीवर कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा परिणाम झाला होता. मात्र, आता धोका कमी झाल्याने तादूळ निर्यातीवर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. कोरोनाच्या काळात केवळ शेती व्यावसयावरच परिणाम झालेला नव्हता. पण आता निर्यातीवर परिणाम होऊ लागल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत होते. मात्र, ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने बासमती तांदळाची निर्यात ही वाढत आहे.

Rice Export : बासमती तांदळाचा सुगंधही दरवळला अन् दरही वाढला, काय आहेत कारणे?
ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:30 AM

कोल्हापूर : नाही म्हणलं तरी शेतीमालाच्या (Export) निर्यातीवर कोरोनाचे नवे रुप अर्थात (Omicron) ओमिक्रॉनचा परिणाम झाला होता. मात्र, आता धोका कमी झाल्याने तादूळ निर्यातीवर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. कोरोनाच्या काळात केवळ शेती व्यावसयावरच परिणाम झालेला नव्हता. पण आता निर्यातीवर परिणाम होऊ लागल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत होते. मात्र, ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने (Basmati Rice) बासमती तांदळाची निर्यात ही वाढत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यामध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे तांदूळ निर्यांतदारांकडून सांगितले जात आहे. एवढेच नाही तर दरातही 500 रुपायांची वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्याने बासमती मागणीत घट झाली होती. पण आता सर्वकाही सूरळीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

नेमकी कोणती अडचण होती निर्यातदारांसमोर?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्येही अनेक देशांनी बाजारपेठा ह्या सुरळीत सुरु ठेवल्या होत्या. पण नोव्हेंबर मध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत होता. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार की काय अशी परस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली तर सर्वांचेच नुकसान होणार होते. त्यामुळे अधिकचा धोका न स्वीकारता नर्यातीवर त्याचा परिणाम झाला होता. नोव्हेंबरमध्ये वाहतूक विस्कळीत झाली होती ती आता सुरळीत झाली आहे.

जुनं ते सोनं, पारंपरिक तांदळालाच मागणी

बाजारपेठेत नवनवे तांदळाचे वाण येत आहेत. असे असतानाही 1121 या पारंपरिक वाणालाच अधिकची मागणी आहे. 1401, 1509 या तांदळाच्या जातीही जगामध्ये लोकप्रिय ठरत आहेत. पारंपरिक तांदळाला अधिक करुन अमेरिकेतून जास्तीची मागणी आहे. तर 1121 या जातीच्या तांदळाला आखाती देशातून मागणी वाढत आहे. तांदळाच्या मागणीत वाढ होत आहे तर दुसरीकडे बासमती तांदळाचे दर 10 हजार क्विंटल होते ते आता 10 हजार 500 वर गेले आहेत.

बासमती बरोबरच इतर जातीच्या तांदळाला मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होत आहेत. याचा सकारात्मक परिणाम तांदळावरही होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बासमती तांदळाच्या दरात वाढ झाली आहे बरोबरच इतर जातीच्या तांदळाच्या मागणीतही वाढ होत असल्याचे निर्यातदार यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता? दोन वर्षात 14 हजार कांदाचाळींचे नियोजन, असा घ्या अनुदानाचा लाभ अन् कांद्याचे संरक्षण करा

Crop Insurance Scheme : आता शेतकऱ्यांच्या दारात येऊन होणार योजनेची अंमलबजावणी, काय आहे सरकारचा उद्देश?

Cotton Crop: कापसाच्या वाढत्या दरामुळे कृषी विभागाचे धोरणही बदलले, हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.