Milk Price : महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही वाढले दुधाचे दर, उत्पादन वाढीसाठी सरकारचे प्रयत्न

गोव्यामध्ये मागणीच्या तुलनेत दुधाचे उत्पादन होत नाही. सध्या गोव्यात साधारण 54 ते 55 हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात येते. राज्याला सध्या किमान अडीच लाख लिटर दुधाची गरज असून ती भागवण्यासाठी गोव्याबाहेरील दूध डेअऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ करण्याच्या अनुशंगाने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

Milk Price : महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही वाढले दुधाचे दर, उत्पादन वाढीसाठी सरकारचे प्रयत्न
गोव्यातही दूधाच्या दरात वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 3:19 PM

गोवा : गत महिन्यात महाराष्ट्रात गायीबरोबरच म्हशीच्या (Milk Rate) दूध दरात वाढ झाली आहे. हा वाढ अत्यल्प असली तरी उत्पादकांना दिलासा देणारी आहे. आता गोव्यातही (Goa Dairy) गोवा डेअरी दुधाच्या दरात वाढ झाली आहे. लिटरमागे 4 रुपयांनी ही वाढ झाली असून  उत्पादकांना याचा थेट फायदा होणार आहे. सोमवार म्हणजेच 2 मे पासून ही वाढ होणार होती पण अचानक रविवारपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांची तारांबळ तर झालीच पण (Customer) ग्राहकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. डेअरीच्या या निर्णयामुळे मात्र, उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शिवाय ही वाढ थेट 4 रुपयांनी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दूध दरवाढीच्या पहिल्याच दिवशी संभ्रम

गोवा डेअरी दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय झाला खरा पण अंमलबजावणीवरुन गोंधळ उडाला. लिटरमागे 4 रुपये अशी दूध दरवाढ झाली आहे. 2 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार होती पण अचानक 1 मे पासूनच हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दूध पिशवीवर जुनेच दर होते. किरकोळ विक्रेत्ये वाढवून पैसे तर मागतात पण पिशवीवर तर दर कमीच असल्याचे ग्राहकांचे म्हणणे होते. त्यामुळे ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्ये यांच्यामध्ये वादंगही निर्माण झाले. दूध दरवाढीचा पहिला दिवस गोंधळातच पार पडला.

दूध उत्पादकांना लिटरमागे थेट 2 रुपयांचा फायदा

गोवा डेअरी दूधच्या दरात लिटरमागे 4 रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये प्रक्रिया होऊन हे दूध ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे 4 रुपयांनी वाढ झाली असली तरी उत्पादकांना मात्र, 2 रुपये लिटरमागे वाढ मिळणार आहे. त्यामुळे उत्पादकही समाधानी आहे. मात्र, ग्राहकांना अचानक झालेली ही वाढ रुचणारी नाही. त्यामुळे दरवाढीच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ पाहवयास मिळाला आहे. आता गोवाकर हा वाढलेला दर मान्य करतात का हे पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न

गोव्यामध्ये मागणीच्या तुलनेत दुधाचे उत्पादन होत नाही. सध्या गोव्यात साधारण 54 ते 55 हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात येते. राज्याला सध्या किमान अडीच लाख लिटर दुधाची गरज असून ती भागवण्यासाठी गोव्याबाहेरील दूध डेअऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ करण्याच्या अनुशंगाने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. दुधाच्या दरात वाढ झाल्याने आता दूध व्यवसयामध्ये वाढ होणार का हे पहावे लागणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.