Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Onion : वाढीव कांदा उत्पादनाचे करायचे काय? सरकारच्या धोरणावरच कांदा दराचे भवितव्य..!

कांदा पिकातून नुकसान होऊ अथवा फायदा, काळाच्या ओघात या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामातील कांद्याचे क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. देशात 11 लाख हेक्टराहून अधिकच्या क्षेत्रावर कांद्याची लागवड झाल्याने यामधून 220 लाख टन उत्पादन अपेक्षित धरले जात आहे. यामध्ये नुकसानीचा विचार केला तरी 150 लाख टन कांदा हा विकता येणार आहे. ही झाली एक बाजू पण या हंगामात 125 लाख टन कांद्याचीच आवश्यकता असते.

Summer Onion : वाढीव कांदा उत्पादनाचे करायचे काय? सरकारच्या धोरणावरच कांदा दराचे भवितव्य..!
ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:36 AM

पुणे : कांदा पिकातून नुकसान होऊ अथवा फायदा, काळाच्या ओघात या (Cash Crop) नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यंदाच्या (Summer Season) उन्हाळी हंगामातील (Onion Area) कांद्याचे क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. देशात 11 लाख हेक्टराहून अधिकच्या क्षेत्रावर कांद्याची लागवड झाल्याने यामधून 220 लाख टन उत्पादन अपेक्षित धरले जात आहे. यामध्ये नुकसानीचा विचार केला तरी 150 लाख टन कांदा हा विकता येणार आहे. ही झाली एक बाजू पण या हंगामात 125 लाख टन कांद्याचीच आवश्यकता असते.त्यामुले उर्वरीत 30 लाख टन कांद्याचे करायचे काय असा सवाल आहे. पण जर सरकारने कांदा निर्यातीबाबत योग्य धोरण ठरवले तरच शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. कांद्याचे दर वाढताच साठवणूकीतला कांदा मार्केटमध्ये आणण्याचे धोरण आखले जाते त्याचप्रमाणे अतिरिक्त उत्पादन झाले तर त्याच्या निर्यातीचेही नियोजन होणे गरजेचे आहे.

काय आहेत संकटे?

सध्या उन्हाळी हंगामातील कांदा क्षेत्रात वाढ झाली असली तरी गतवर्षीप्रमाणे वातावरणात बदल झाला तर याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. शिवाय कांद्याचे क्षेत्र वाढले असले तरी आता निर्यातीचा एकच पर्याय समोर आहे. निर्यातीसाठी कंटनेरची उपलब्धता आणि दरात झालेली भाडेवाढ नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शिवाय 15 मार्च ते 15 एप्रिल या दरम्यान बंदरातून वाहतूकीचा कमी होणारा वेग या सर्व अडचणीच्या बाबी आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारचे काय धोरण राहणार यावरच सर्वकाही अवलंबून असणार आहे.

वाढीव क्षेत्रामुळे 11 लाख टन अधिकचे उत्पादन

यंदा राज्यात मुख्य पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असली तरी त्याची कसर भरुन काढण्यासाठी कांदा लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्रात 55 हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे. असे असले तरी नाफेडच्या वतीने दरवर्षी कांदा खरेदी केली जाते. गतवर्षी 2 हजार 200 टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. यंदा उत्पादन वाढणार म्हणून यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. यंदा 1 हजार 500 टन कांद्याची खरेदी केली जाऊ शकते. दिल्लीच्या बाजारात नाफेड यंदा 5 लाख टन कांद्याची खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या दोन वर्षात कांदा निर्यातीची स्थिती

गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान म्हणजेच उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी सुरु झाली की, 10 लाख 55 हजार टन कांद्याची निर्यात झाली होती. यामधून 2 हजार 295 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तर 2020-21 मध्ये 15 लाख 78 हजार टन कांद्याची निर्यात झाली होती.तर यामधून 2 हजार 826 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा क्षेत्रामध्ये वाढ झाली असल्याने केंद्र सरकारने आताच निर्यातीचे धोरण ठरवणे गरजेचे झाले आहे.

संबंधित बातम्या :

ज्याच्यावर सारा पैसा लावला, ते पिक घटलं, वरखर्च देणारा भाजीपालाही कवडीमोलाचा, सांगा शेती करायची कशी ?

Photo : लुखामसल्यात लाखमोलाच्या ऊसाला आग, 12 एकरातील ऊस भस्मसात

Drone Farming : केंद्राचा निर्णय, राज्याची अंमलबजावणी, कृषी विद्यापीठांमध्ये काय आहेत हालचाली?

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.