Nanded : बहारों फुल बरसाओ… लग्नसराईनं फुलांचाही रुबाब वाढला, कोरोनानंतर प्रथमच सुगीचे दिवस

पीक बहरलं तरी वातावरण बदलाचा फटका आणि बाजारपेठेत दाखल केले तरी दरातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसयाचे गणितच बिघडत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन फुलांची लागवड केली तर कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे नुकसान ठरलेलेच. पण यंदा परस्थिती बदलत आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील झाले आहेत तर दुसरीकडे लग्नसराईमुळे फुलांच्या दरात वाढ होत आहे.

Nanded : बहारों फुल बरसाओ... लग्नसराईनं फुलांचाही रुबाब वाढला, कोरोनानंतर प्रथमच सुगीचे दिवस
लग्नसराईमुळे का होईना फुलांच्या दरात वाढ होत आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 10:41 AM

नांदेड : पीक बहरलं तरी (Climate Change) वातावरण बदलाचा फटका आणि बाजारपेठेत दाखल केले तरी दरातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसयाचे गणितच बिघडत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन (Floricultural) फुलांची लागवड केली तर कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे नुकसान ठरलेलेच. पण यंदा परस्थिती बदलत आहे. (Corona) कोरोनाचे निर्बंध शिथील झाले आहेत तर दुसरीकडे लग्नसराईमुळे फुलांच्या दरात वाढ होत आहे. दोन वर्षानंतर यंदा परस्थिती बदलत आहे. मागणी आणि दर वाढत गेले तर गेल्या दोन वर्षातील नुकसान भरुन निघेल असा विश्वास फुल उत्पादक शेतकऱ्यांना आहे. नायगांव तालुक्यातील प्रताप वाघमारे यांनी 20 गुंठ्यामध्ये गलांडा जातीच्या फुलाची लागवड केली आहे. ऐन लग्नसराईमध्येच तोड होत असल्याने त्यांना वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. लग्नसराईमुळे का होईना दरात वाढ होत असून हेच फुल उत्पादकांसाठी दिलासादायक आहे.

20 गुंठ्यात फुलमळा, वाढीव उत्पन्नाची अपेक्षा

नायगांव तालुक्यातील गोळेगांव इथल्या प्रताप वाघमारे यांनी केवळ 20 गुंठ्यातच पण योग्य ते नियोजन करुन गलांडा जातीच्या फुलांची जोपसणा केली आहे. लागवड करीत असतानाच लग्नसराईत तोड होईल हाच उद्देश त्यांनी डोळ्यसमोर ठेवला होता. अखेर त्यांचा उद्देश साध्य होताना दिसत आहे. कारण कोरोनाचे निर्बंध हटल्याने लग्नही धुमधडाक्यात होऊ लागल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय उत्पादन क्षेत्र कमी असल्याने आणखीन दर वाढतील अशी अपेक्षा आहे.

कोरोना काळातील नुकसान भरुन काढणार

गेल्या दोन वर्षापासून फुलांचा बाजारच उठलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमच पार पडले नाहीत तर लग्नसमारंभात केवळ दोन हरालाच महत्व होते. त्यामुळे फुल उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा झालेले नुकसान भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. एकीकडे बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत तर दुसरीकडे उत्पादन क्षेत्रात घट. या दोन्हीचा फायदा ज्यांनी फुलांचे उत्पादन घेतले अशा शेतकऱ्यांना होणार आहे.

सध्या काय आहे बाजारपेठेतील स्थिती?

लग्नसराईच्या अनुशंगाने का होईना फुलांच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. गलांडा जातीच्या फुलाच्या किंमती ह्या 20 ते 25 रुपये किलो अशा होत्या. मात्र, आता दरात सुधारणा होत असल्याचे शेतकरी प्रताप वाघमारे यांनी सांगितले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच 40 रुपये किलोने मागणी सुरु आहे. भविष्यात आणखीन दरात वाढ होईल असा विश्वास त्यांना आहे.

संबंधित बातम्या :

Mango : ज्याची भीती तेच झाले, आंब्याची मागणी वाढली उत्पादन घटलं हे सर्व वातावरणातील बदलाने घडलं..!

Unseasonable Rain: द्राक्षानंतर कांदा नुकसानीने डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला! देवळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

Central Government : ‘ड्रोन’ शेतीला अखेर ग्रीन सिग्नल, काय असणार अटी-नियम? वाचा सविस्तर

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.