Nanded : शेंगतेलाचे दर गगणाला, भुईमूग मात्र कवडीमोलात, शेतकऱ्यांचा निर्धार येणार का कामी?

मुख्य पिकांच्या उत्पादनातून घट झाली असली तरी हंगामी पिकांना अधिकचा दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. शिवाय उन्हाळ्यामध्ये पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज आणि उन्हाळी भुईमूगाची लागवड केली होती. या पिकांना तरी अपेक्षित दर मिळेल असा आशावाद होता पण भुईमूगाला आता केवळ 5 हजार रुपये क्विंटल असा दर आहे.

Nanded : शेंगतेलाचे दर गगणाला, भुईमूग मात्र कवडीमोलात, शेतकऱ्यांचा निर्धार येणार का कामी?
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 9:37 AM

नांदेड : शेतकऱ्यांच्या शेतीमाल असातानाही त्याला दर ठरविण्याचा अधिकार नाही. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले तरी उत्पन्न वाढत नाही हे वास्तव आहे. आता (Edible oil) खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये आठवड्याला वाढ होत असताना दुसरीकडे (Groundnut) भुईमूगाच्या दरात घट होत आहे. शेंगदाण्यावर प्रक्रिया करुनच खाद्यतेलाची निर्मिती होत असली तरी दरातील तफावत ही शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे भुईमूगाची विक्री करण्यापेक्षा शेतकरी साठवणूकीवरच भर देत आहेत. शेतकऱ्यांना आता योग्य (Groundnut Rate) दराची प्रतिक्षा आहे. सद्यस्थितीला भुईमूगाला 5 हजार रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.

हंगामी पिकांच्या दरात घट

मुख्य पिकांच्या उत्पादनातून घट झाली असली तरी हंगामी पिकांना अधिकचा दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. शिवाय उन्हाळ्यामध्ये पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज आणि उन्हाळी भुईमूगाची लागवड केली होती. या पिकांना तरी अपेक्षित दर मिळेल असा आशावाद होता पण भुईमूगाला आता केवळ 5 हजार रुपये क्विंटल असा दर आहे. गतवर्षीपेक्षा दरात घट झाली असून शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतिक्षा आहे. कांदा, कलिंगड, खरबूज या सर्वच हंगामी पिकांचे दर हे घटलेले आहेत.

साठवणूकीवर भर

पिकांची काढणी झाली की लागलीच विक्री असेच शेतकऱ्यांचे धोरण असते पण आता शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करुन शेतीमालाची विक्री करीत आहे. यापूर्वी खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीमध्येही शेतकऱ्यांनी अशीच भूमिका घेतली होती. आता उन्हाळी भुईमूगाची काढणी सुरु असताना केवळ 5 हजार असा दर आहे. वाढीव दर मिळाल्याशिवाय शेतीमालाची विक्री नाही असा निर्धारच शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे काढणी झाली की बाजाररपेठ न दाखिवता आता भुईमूगाच्या शेंगाची थप्पी लावली जात आहे.

हे सुद्धा वाचा

भुईमूग क्षेत्रात वाढ

पोषक वातावरणाचा परिणाम भुईमूग क्षेत्रावर झाला आहे. शिवाय यंदा पाण्याची उपलब्धताही होती. नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर या दोन तालुक्यात भुईमुंगाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक संख्येने होते, या दोन्ही तालुक्यातील भुईमुंगाची काढणी आटोपलीय. मात्र सध्या भुईमुंगाला प्रति क्विंटल पाच हजार इतकाच भाव मिळत असल्याने शेतकरी माल साठवून ठेवताना दिसतोय. भुईमुंगाला प्रति क्विंटल सात हजारांचा भाव शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तरच उत्पादन खर्च निघून शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडणार आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.