Onion Crop : ‘भीम शक्ती’ने पाच एकरात चौपट उत्पन्न मिळणार, कांदा बियाणे ठरले टर्निंग पॉईंट..!

कांदा उत्पादनापेक्षा उत्पादित झालेल्या कांद्याची साठवणूक आणि दरात वाढ झाली की विक्री हीच उत्पन्न वाढीचे खरे सूत्र आहे. मात्र, सध्या उन्हाळी कांदा टिकतच नाही त्यामुळे काढणी, छाटणी झाली की लागलीच विक्री. कवडीमोल दर असतानाही कांदा हा वावराबाहेर काढण्यावरच शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. पण याच समस्येवर घोडेगावच्या माऊलीने पर्याय काढला. अनेक शेतकऱ्यांचा कांदा टिकून राहत नसल्याने त्यांना विक्री करण्याची नामुष्की ओढावते म्हणून काढणीनंतरही कांदा टिकून राहील अशा बियाणांचा त्यांनी शोध घेतला.

Onion Crop : 'भीम शक्ती'ने पाच एकरात चौपट उत्पन्न मिळणार, कांदा बियाणे ठरले टर्निंग पॉईंट..!
अहमदनगर येथील तरुण शेतकऱ्याने गोट कांद्याची लागवड केली असून यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 1:22 PM

अहमदनगर : कांदा उत्पादनापेक्षा उत्पादित झालेल्या (Onion Stock) कांद्याची साठवणूक आणि दरात वाढ झाली की विक्री हीच उत्पन्न वाढीचे खरे सूत्र आहे. मात्र, सध्या उन्हाळी कांदा टिकतच नाही त्यामुळे काढणी, छाटणी झाली की लागलीच विक्री कवडीमोल दर असतानाही कांदा हा वावराबाहेर काढण्यावरच शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. पण याच समस्येवर घोडेगावच्या माऊलीने पर्याय काढला. अनेक शेतकऱ्यांचा कांदा टिकून राहत नसल्याने त्यांना विक्री करण्याची नामुष्की ओढावते म्हणून काढणीनंतरही कांदा टिकून राहील अशा (Onion Seed) बियाणांचा त्यांनी शोध घेतला. यासाठी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी आणि (KVK) केव्हीके कृषी संस्थेचा अभ्यास त्यांनी केला. आणि केव्हीके येथील ‘भीमा शक्ती’चे बियाणेच उत्पादन वाढीचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार आहे. काढणीनंतरही हा कांदा गोठ्यामध्ये ठेवला तरी किमान आठ ते नऊ महिने टिकून राहतो. वाढीव दर मिळताच विक्री करण्याचा पर्याय माऊलीकडे असल्याने यामधून विक्रमी उत्पन्न मिळेल असा त्यांचा दावा आहे.

साठवणूकीचा असा हा फायदा

कांदा दरात कायम चढ-उतार हा ठरलेलाच आहे. महिन्याभरापूर्वी 3 हजार रुपये क्विंटल असलेला कांदा आज 800 रुपयांवर आलेला आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना तो विकावाच लागत आहे. कारण कांदा नाशवंत आहे शिवाय वाढते ऊन आणि वातावरणातील बदल याचा धोका असल्याने काढणी झाली की दराचा विचार न करता विक्री यामुळे उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे साठवणूक करुनही कांद्याच्या दर्जावर परिणाम होणार नाही असे वाण महत्वाचे आहे. यामुळे दर वाढले की विक्री करता येते.

‘भीम शक्ती’ वाणाचे काय आहे वेगळेपण

नियमित कांदा काढणीनंतर 2 ते 3 महिने टिकून राहतो अशा परस्थितीमध्ये दर कमी-जास्त झाला तरी त्याची परवा न करता शेतकऱ्यांना कांदा हा विकावाच लगतो. त्यामुळे उत्पादन वाढणे महत्वाचे नाही तर उत्पादित झालेल्या कांद्याचे नियोजन महत्वाचे आहे. भीम शक्ती वाणाचा कांदा हा 8 ते 9 महिने टिकून राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल त्यावेळी कांदा बाजारात आणणो शक्य आहे.

एकरी 10 लाखाच्या उत्पादनाचे उद्दीष्ट

कांदा हे चार महिन्याचे पीक आहे. माऊली भोंडवे यांनी KVK येथून आणले असून त्यांना पाच एकर साठी 2 लाख 25 हजार रुपये खर्च आला आहे. तर ठिबक , मजुरी असा 2 लाख रुपये खर्च आलाय. हे चार महिन्यांचे पीक असून त्यांना एकरी 10 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. शेतात नवं नवीन बी-बियाणांचा वापर केल्यास निश्चितच चांगले उत्पन्न मिळू शकते हेच माऊली यांनी दाखवून दिले आहे.

संबंधित बातम्या :

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

Sugarcane Sludge: हंगामाच्या अंतिम टप्प्यात पेटणार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न, ऊस फडात अन् कारखान्यांची आवराआवर

Toor Crop : केंद्र सरकारचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण, ज्याची भीती शेतकऱ्यांना तोच निर्णय सरकारचा..!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.