Watermelon : उत्पादन वाढीसाठी कायपण!, हनुमंतगाव शिवारात कलिंगड शेतातच भव्य मेळावा
यंदा शेती व्यवसयाचे चित्र जरा वेगळेच आहे. जे मुख्य पिकांमधून घडलं नाही ते हंगामी पिकातून साधलं आहे. सध्या तर कलिंगड उत्पादकांची चांदी आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अतोनात नुकसान झाले होते. यंदा मात्र पोषक वातावरण आणि रखरखत्या उन्हामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ होत आहे. अशा परस्थितीमध्ये उत्पादनवाढीची एकही संधी शेतकऱ्यांनी गमावू नये यासाठी थेट कलिंगड शेतामध्येच मार्गदर्शन केले जात आहे.
औरंगाबाद: यंदा शेती व्यवसयाचे चित्र जरा वेगळेच आहे. जे (Main Crop) मुख्य पिकांमधून घडलं नाही ते हंगामी पिकातून साधलं आहे. सध्या तर (Watermelon) कलिंगड उत्पादकांची चांदी आहे. गेल्या दोन वर्षात (Corona) कोरोनामुळे अतोनात नुकसान झाले होते. यंदा मात्र पोषक वातावरण आणि रखरखत्या उन्हामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ होत आहे. अशा परस्थितीमध्ये उत्पादनवाढीची एकही संधी शेतकऱ्यांनी गमावू नये यासाठी थेट कलिंगड शेतामध्येच मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी वैजापूर तालुक्यातील हनुमंतगावच्या शिवारात पार पडलेल्या कलिंगड मेळाव्याची मोठी चर्चा सुरु आहे. उत्पादन घेताना शेतकऱ्यांकडून कोणती चूक होऊ नये यासाठी शेतकरी साईनाथ राजपूत यांच्या शेतामध्ये ‘कावेरी-1901’ या वानावर भव्य कलिंगड मेळावा आयोजित करण्यात आला होता.
उत्पादन वाढीसाठी अनोखा उपक्रम
यंदा कलिंगडचे दर टिकून आहेत शिवाय कोरोनाचा कोणताही धोका नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षात झालेले नुकसान भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. सध्या कलिंगड हे बहरात आहे. हे एक हंगामी पीक असून कमी कालावधीचे असले तरी औषध फवारणी आणि योग्य निगराणी केली तर उत्पादनच पदरी पडणार आहे. यामुळे कावेरी 1901 वाणाच्या कलिंगडचे उत्पादन वाढीसाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कलिंगड हे 60 दिवसाचे पीक असून पाण्याचे योग्य नियोजन आणि रोगराईपासून संरक्षण केले तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर भांडे यांनी सांगितले.
कलिंगड मागणी वाढली उत्पादन घटले
सध्याच्या वाढत्या उन्हामुळे कलिंगडला हंगाम सुरु झाल्यापासून मागणी आहे. शिवाय सध्या पवित्र रमजान महिना सुरु आहे. त्यामुळे मागणीत वाढ ही कायम आहे. तर दुसरीकडे गत दोन वर्षात कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा क्षेत्र हे घटले होते. त्यामुळे काही निवडक शेतकऱ्यांनाच वाढलेल्या दराचा फायदा मिळत आहे.
कलिंगड मेळाव्याचे वेगळेपण
कलिंगड उत्पादनवाढीसाठी थेट शेतावर जाऊन केलेले मार्गदर्शनच फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळेच कावेरी सीड्सचे विशाल जाधव उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी कार्यक्रमाच्या नियोजनामागील उद्देश सांगतानाच कलिंगडाव्या लागवडीबद्दल जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती दिली .अशाप्रकारे पहिल्यांदाच मेळावा पार पडला आहे. यामधून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही झाले अधिकच्या वाणांची शेतकऱ्यांना माहितीही मिळाली.
संबंधित बातम्या :
Latur Market : सोयाबीनचे दर स्थिरावले, तुरीच्या दराने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली
Video : शॉर्टसर्किटमुळे शेतीमालाची होळी, डोळ्यासमोरच स्वप्नांचा चुराडा झाल्याने शेतकऱ्याचा टाहो