Banana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय?

जळगाव, रावेल येथील केळीला अधिकतर मागणी ही उत्तर भारतामधून असते. यंदा या भागातील उत्पादनातही घट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट उत्पादनावर झालेला आहे. शिवाय केळीला बारमाही मागणी असते त्यामुळे हरियाणा ,मध्य प्रदेश ,काश्मीर येथून केळी घेण्यासाठी ट्रक दाखल झाले आहेत पण घटलेल्या उत्पादनामुळे 15 दिवस वेटींगवर थांबावे लागत आहे.

Banana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय?
जळगाव केळी उत्पादनात घट झाली असून विक्रमी दर मिळत आहे.
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 4:22 PM

जळगाव : हंगामाच्या सुरवातीला किमान उत्पादनावर झालेला खर्च पदरी पडावा म्हणून व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन (Banana Rate) केळीचा दर ठरविला होता. असे असतानाही (Traders) व्यापाऱ्यांनी मनमानी करीत कवडीमोल दरात केळीची खरेदी केली होती. पण आता याच व्यापाऱ्यांना रांगेत उभे राहून केळी खरेदी कऱण्याची नामुष्की ओढावली आहे. केळी खरेदीसाठी ट्रान्सपोर्टवर 400 ते 500 ट्रक ह्या उभ्या आहेत. वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे ही स्थिती ओढावली आहे. जळगावातच नाहीतर इतरत्रही (Banana Production) केळी उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे सध्या केळी 22 ते 24 रुपये किलो असा दर असतनाही केळी उपलब्ध होत नाही. विक्रमी दर मिळत असला तरी घटत्या उत्पादनामुळे ना नफा ना तोटा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

परराज्यातून केळीला मागणी

जळगाव, रावेल येथील केळीला अधिकतर मागणी ही उत्तर भारतामधून असते. यंदा या भागातील उत्पादनातही घट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट उत्पादनावर झालेला आहे. शिवाय केळीला बारमाही मागणी असते त्यामुळे हरियाणा ,मध्य प्रदेश ,काश्मीर येथून केळी घेण्यासाठी ट्रक दाखल झाले आहेत पण घटलेल्या उत्पादनामुळे 15 दिवस वेटींगवर थांबावे लागत आहे. व्यापारी वाढीव दराने केळी खरेदीला तयार आहेत मात्र, उत्पादनच नसल्याने शेतकरी आणि व्यापारी देखील हताश आहेत. 15 दिवस एकाच जागी ट्रक उभा असल्याने येथील मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम

गतवर्षी झालेल्या अवकाळीचा परिणाम आता उत्पादनावर आणि पिकावर दिसून येत आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे केळीवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता. शिवाय नंतरच्या उन्हामध्ये बागा करपल्या होत्या. या सर्वांचा परिणाम केळी दरावर झाला आहे. जळगावप्रमाणेच उत्तर भारतामधील उत्पादनावरही असाच परिणाम झाला आहे. मात्र, आता वाढलेली मागणी आणि घटलेले उत्पादन याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे.

हे सुद्धा वाचा

जळगावात पहिल्यांदाच अशी स्थिती

दरवर्षी जळगावातून इतरत्र राज्यात केळी नेली जाते. पण मागणी प्रमाणात असते. यंदा उत्पादनात घट झाली आणि मागणी वाढली. त्यामुळे ही स्थिती ओढावली आहे. ट्रान्सपोर्टसमोर 400 ते 500 वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जळगावात यंदा प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विक्रमी दर मिळत असला तरी उत्पादनातच घट झाल्याने शेतकरीही हताश आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.