Agricultural : शेतकऱ्यांनो चाढ्यावर मूठ धरण्यापूर्वी आगोदर खिसा गरम ठेवा, खरिपाच्या तोंडावर खतासह बियाणांचेही दर वाढले
यंदा कच्च्या मालाचा पुरवठा आणि रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम हा रासायनिक खतांवर होणारच होता. पण खतासाठी सरकारने वाढील अनुदान दिल्याने याची झळ शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नव्हती पण आता ऐन खरिपाची पेरणी सुरु होत असताना केवळ रासायनिक खतांच्या किंमतीमध्येच नाहीतर कापूस आणि सोयाबीन बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे.
पुणे : शेतीमालाचे दर बेभरवश्याचे असताना मात्र, हंगामाची पूर्वी (Fertilizer & Seed) खताचे आणि बियाणांच्या दरात वाढ ही ठरलेलीच आहे. यंदा तर हंगाम सुरु होण्यापासून दरात वाढ ही निश्चित मानली जात होती. पण (Kharif Season) हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खत आणि बियाणांच्या दरात झालेली वाढ ही जाहीर नव्हती. पण आता उद्या (Kharif Sowing) पेरणी म्हणताच रासायनिक खतांसह बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक यासारखी कारणे पुढे करीत रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये 18 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चाढ्यावर मूठ ठेवण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपला खिसा चापचून पहावा लागेल.
हंगामाच्या सुरवातीपासूनच दरवाढीचे संकेत
यंदा कच्च्या मालाचा पुरवठा आणि रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम हा रासायनिक खतांवर होणारच होता. पण खतासाठी सरकारने वाढील अनुदान दिल्याने याची झळ शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नव्हती पण आता ऐन खरिपाची पेरणी सुरु होत असताना केवळ रासायनिक खतांच्या किंमतीमध्येच नाहीतर कापूस आणि सोयाबीन बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. उत्पादनवाढीसाठी खरीप हंगामात रासायनिक खताचा वापर केला जातो. पण यंदा दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना जमिनीत बी गाढल्यापासून अधिकचा खर्च करावा लागणार आहे. विशेषत: रासायनिक खतांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
असे वाढले आहेत दर
खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी शेतकरी रासायिनक खतांचा वापर करतातच. त्यामुळे डीएपी खताची बॅग गतवर्षी 1 हजार 200 रुपये तर यंदा 1 हजार 350 रुपयांना मिळत आहे. 10:26:26 हे गतवर्षी 1 हजार 250 तर यंदा 1 हजार 470, 20:20:0:13 हे खत गेल्या वर्षी 1 हजार 200 तर आता 1 हजार 450, एमओपी हे खत गेल्यावर्षी 900 रुपयांना तर आता 1 हजार 700 रुपयांना मिळत आहे. एसएसपी हे गतवर्षी 330 तर यंदा 450 रुपयांना बॅग याप्रमाणे घ्यावे लागत आहे.
बियाणांच्या किंमतीमध्येही वाढ
हंगामाच्या सुरवातीलाच महाबीजने सोयाबीन या मुख्य पिकाच्या बियाणे दरात वाढ केली होती. त्यानंतर हंगाम सुरु होईपर्यंत सर्वच बियाणे कंपन्यांनी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस हेच खरिपातील मुख्य पिके आहेत. सोयबीन आणि कापसाच्या बियाणे दरात 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. असे असताना दुसरीकडे सोयाबीनच्या दरात वाढ झालेली असून ही जमेची बाजू असल्याचे उद्योजक मनमोहन कलंत्री यांनी सांगितले आहे.कापसाचे बियाणे गेल्यावर्षी 475 ग्रॅम हे 767 रुपायांना तर यंदा 810 रुपयांना मिळत आहे. सोयाबीनची 30 किलोची बॅग गेल्या वर्षी 3 हजार 900 रुपयांना तर यंदा 4 हजार 350 रुपयांना मिळत आहे.