Latur Market : सोयाबीन पाठोपाठ खरिपातील ‘या’ शेतीमालाचे दर वाढले, हरभऱ्याची विक्रमी आवक

यंदा हंगामाच्या सुरवातीचे आणि नंतरचे चित्र हे वेगळेच राहिलेले आहे. सोयाबीन असो की कापूस आणि आता तूर सुरवातीला कमी दर आणि अवघ्या महिन्यात चित्र बदलण्यास सुरवात. आतापर्यंत जे सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत घडले तेच आता तुरीबाबत होताना दिसत आहे. यंदा उत्पादन घटूनही सुरवातीला तुरीला 5 हजार 800 पर्यंतचा दर होता. दीड महिन्यातच तुरीच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे.

Latur Market : सोयाबीन पाठोपाठ खरिपातील 'या' शेतीमालाचे दर वाढले, हरभऱ्याची विक्रमी आवक
बाजार भावापेक्षा हमीभाव केंद्रावर तुरीला अधिकचा दर असल्याने खरेदी केंद्रावर आवक वाढली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 4:03 PM

लातूर : यंदा हंगामाच्या सुरवातीचे आणि नंतरचे चित्र हे वेगळेच राहिलेले आहे. सोयाबीन असो की कापूस आणि आता तूर सुरवातीला कमी दर आणि अवघ्या महिन्यात चित्र बदलण्यास सुरवात. आतापर्यंत जे सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत घडले तेच आता (Toor Crop) तुरीबाबत होताना दिसत आहे. यंदा उत्पादन घटूनही सुरवातीला तुरीला 5 हजार 800 पर्यंतचा दर होता. दीड महिन्यातच तुरीच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे. यंदा (NAFED) नाफेडच्या माध्यमातून (Guaranteed price) हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 चा दर ठरवून देण्यात आला आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कल कमी असला तरी केंद्राची स्थापना होताच बाजारपेठेतले दरही वाढले होते. आता हमीभाव पेक्षा अधिकचा दर बाजारात मिळत असल्याने या केंद्राकडे कोण फिरणार हो मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे सोयबीनचे दर हे स्थिर असून आता आवक ही वाढत आहे.

हमीभाव केंद्र नावालाच

नाफेडच्यावतीने राज्यात तूर हमीभाव केंद्र उभारण्यात आलेली आहेत. मात्र, येथील नियम-अटी आणि महिन्याभरानंतर खात्यावर पैसे यामुळे शेतकरी खुल्या बाजारातच तूर विक्रीला प्राधान्य देत होता. आता तर हमीभावापेक्षा अधिकचा दर खुल्या बाजारात मिळत आहे. त्यामुळे खरेदी केंद्र हे ओस पडले आहेत. लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवकही वाढली आहे. मंगळवारी 20 हजार पोत्यांची आवक झाली आहे. तर 6 हजार 500 दर मिळत आहे. कापूस, सोयाबीन नंतर आता तुरीच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी आहे.

सोयाबीनचे दर स्थिर, आवक मात्र वाढली

गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 7 हजार 300 वर स्थिरावलेले आहेत. यंदाच्या हंगामातील हा चांगला दर मानला जात आहे. शिवाय सोयाबीनची साठवणूक करुन ठेवल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदला मिळाला आहे. सोयाबीनच्या दरातील चढ-उतार कमी झाला असून या दरम्यानच राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या बाजारपेठेमध्ये खरिपातील सोयाबीन, तूर तर रब्बी हंगामातील हरभरा या पिकाची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सोयाबीन 34 हजार पोते, तूर 20 हजार तर हरभऱ्याची 40 हजार पोत्यांची आवक मंगळवारी लातूरच्या बाजार समितीमध्ये झाली होती.

संबंधित बातम्या :

Special News : महावितरणचा ‘शॉक’: वीज जोडणीविनाच हजारोंचे वीजबिल, महिला दिनादिवशीच विधवेची क्रुरचेष्टा

अशक्य असे काहीच नाही, वाढत्या ऊसक्षेत्रावर शेतकऱ्यांचा रामबाण उपाय, शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची जोड

Cotton : कापूस दरवाढीला ‘ब्रेक’, आता साठवणूक की विक्री..! शेतकऱ्यांनी नेमके करावे काय ?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.