Red Cabbage: भारतामध्ये लाल कोबीची वाढती मागणी, जाणून घ्या लागवड पध्दती अन् फायदे

काळाच्या ओघात जसा पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे अगदी त्याप्रमाणेच ग्राहकांच्या खाण्या-पिण्यातही. बाजारपेठेत आता नवनविन प्रकारच्या भाज्यांच्या मागणीत वाढ होत आहे. भारतात लाल कोबीची मागणी खूप वेगाने वाढत आहे. भाज्यांची आवड ही केवळ चवीवरुन नाही तर आरोग्याच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करुन होत आहे. आरोग्याबाबत जागरूक असलेले नागरिक आता पोषक तत्वांनी समृद्ध फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करू लागले आहेत.

Red Cabbage: भारतामध्ये लाल कोबीची वाढती मागणी, जाणून घ्या लागवड पध्दती अन् फायदे
लाल कोबी
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 5:30 AM

मुंबई : काळाच्या ओघात जसा (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे अगदी त्याप्रमाणेच ग्राहकांच्या खाण्या-पिण्यातही. बाजारपेठेत आता नवनवीन प्रकारच्या भाज्यांच्या मागणीत वाढ होत आहे. भारतात (Red Cabbage) लाल कोबीची मागणी खूप वेगाने वाढत आहे.(Vegetable)  भाज्यांची आवड ही केवळ चवीवरुन नाही तर आरोग्याच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करुन होत आहे. आरोग्याबाबत जागरूक असलेले नागरिक आता पोषक तत्वांनी समृद्ध फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करू लागले आहेत. कोरोनाच्या दरम्यान झालेला हा बदल असून याच सवयी कायम ठेवण्याचा नागरिकांचा प्रयत्न आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घेऊन उत्पन्न वाढवण्याची शेतकऱ्यांकडेही चांगली संधी आहे. सध्या लाल कोबीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, उत्पादनासाठी ही नवी भाजी असल्याने याची योग्य माहिती करुन घेणे गरजेचे आहे. याची लागवड करण्याची पद्धत हिरव्या पानाच्या कोबीसारखीच आहे, परंतु किंमतीच्या बाबतीत अनेक पटींनी फरक आहे.

जे शेतकरी पूर्वीपासूनच हिरव्या पानकोबीची लागवड करीत आहेत त्यांच्यासाठी ही पध्दत सोपी आहे. अगदी त्या प्रमाणेच लाल कोबीचीही लागवड पध्दत आहे. लाल कोबीसाठी हलक्या प्रतीची आणि गुळगुळीत जमिन आवश्यक आहे. ज्या भागात 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आहे त्या भागात लाल कोबीचे उत्पादन अधिक मिळते.यापेक्षा जर तापमान अधिकचे असेल तर मात्र उत्पन्न कमी होऊ शकते. संकरीत वाणाची निवड केली तरच अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.

लागवडीनंतर अशी घ्या काळजी

पानकोबीचे रोपण करण्यापूर्वी शेतजमिनीची मशागत महत्वाची आहे. नांगरण करुन या जमिनीत हेक्टरी 10 ते 12 कुजलेले शेणखत टाकणे गरजेचे आहे.यानंतर हेक्टरी 60 किलो नायट्रोजन, 40 किलो फॉस्फरस आणि 40 किलो पोटॅश देण्याचा सल्ला दिला जातो. पानकोबीचे रोपण केल्यानंतर हलक्या पध्दतीने त्यास पाणी देणे गरजेचे आहे जेणेकरुन जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण अबाधित राहील. योग्य प्रकारे जोपासणा केल्यावरच उत्पादनात भर पडणार आहे. शिवाय पूर्ण वाढ झाल्यावरच कापणी करणे चांगले मानले जाते.लाल कोबीची लागवड ही हिरव्या पानकोबीप्रमाणेच आहे पण स्थानिक पातळीवर कृषी सहायकाचे मार्गदर्शन घेतले तर अधिकचा फायदा होणार आहे. शिवाय योग्य वाणाची निवडही करता येणार आहे.

लाल पत्ताकोबी पौष्टिकतेत समृद्ध आहे

लाल पानकोबीमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. प्रामुख्याने फायटोकेमिकल्स, अँटिऑक्सिडंट्स, पोषक द्रव्ये आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आवश्यक घटकांमध्ये थायमिन, राइबोफ्लेविन, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, आहारातील फायबर आणि बी जीवनसत्त्वे यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

Onion : कांदा दराचा लहरीपणा, एका रात्रीतून असे काय दर घसरले की, व्यापारीही चक्रावले

पश्चिम विदर्भात यंदाही पाणी टंचाईची शक्यता, धरणात उरलंय फक्त एवढंच पाणी…

पहिला मान उस्मानाबादला : शेतकऱ्यांची चार महिन्यांची प्रतिक्षा संपली, आता थेट बॅंक खाते चेक करा..!

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.