आनंदवार्ता! आता शेतकऱ्यांना मिळणार 3000 रुपये महिना पेन्शन, कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी, किसान समृद्धी केंद्र, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना या सारखे उपक्रम राबवत असते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये तीन समान टप्प्यात थेट बँकेत जमा केले जातात.
मुंबई : भारत हा कृषि प्रधान देश असून शेतकरी या देशाचा कणा आहे. शेतकऱ्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. कारण बळीराजा जगला तर देश जगेल, अशी या मागची भावना आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी, किसान समृद्धी केंद्र, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना या सारखे उपक्रम राबवत असते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये तीन समान टप्प्यात थेट बँकेत जमा केले जातात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मिळतात. दुसरीकडे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून योजना राबवत आहे. यासाठी सरकारनं एक पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना उतार वयात मिळेल.
पीएम किसान मानधन योजना छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. या योजनेतून उतार वयात शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विशेष बाब म्हणजे 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले छोटे आणि अत्यल्प शेतकरीच या पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत.आतापर्यंत या योजनेचा लाभ दोन कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
या योजनेंतर्ग शेतकऱ्यांनी 60 वर्षे वयोमर्यादा ओलांडली की त्यांना प्रति महिना 3000 रुपये किमान पेन्शन मिळेल. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पति किंवा पत्नीला पेन्शन म्हणून 50 टक्के रक्कम मिळेल. पेन्शन योजना फक्त पती आणि पत्नी यांना लागू असेल. मुलं या योजनेंतर्गत लाभार्थी नसतील.
कसा मिळेल पेन्शन लाभ
शेतकऱ्यांना 18 ते 40 वयादरम्यान असताना या योजनेसाठी अर्ज करता येईल. यासाठी प्रति महिना 55 ते 200 रुपये वयाच्या 60 वर्षापर्यंत भरावे लागतील. शेतकऱ्याचं वय 60 झाल्यानंतर पेन्शन मिळवण्यास पात्र ठरेल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम त्याच्या खात्यात जमा होईल. पेन्शन योजनेंतर्गत तुम्ही प्रति महिना 100 रुपये जमा केले तर सरकारही 100 रुपये जमा करेल.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता या दिवशी मिळणार!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी शेतकरी 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल,तर या महिन्यात तुम्हाला खूशखबर मिळेल.तर 24 फेब्रुवारीला या योजनेला चार वर्षे पूर्ण होतील. पीएम किसानला 4 वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोदी सरकार शेतकऱ्यांना 13 वा हप्ता भेट देऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. तसेच होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता पाठवू शकते. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 12 हप्ते जारी केले आहेत.