Agriculture News : संत्रा बागांवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव, फळं काळी पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या आठदिवसांपासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह झोडपून काढले आहे.

Agriculture News : संत्रा बागांवर 'लाल्या'चा प्रादुर्भाव, फळं काळी पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
santra cultivationImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 12:32 PM

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील अनेक संत्रा (santra cultivation) बागांवरील ‘लाल्या’ रोगाच्या प्रादुर्भावामुळं झाडावरील 60 ते 70 टक्के फळं लाल,काळी पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संत्रा फळबाग खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या नुकसान ग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून दिलासा देण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी (washim farmer) केली आहे. राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या बागांचं नुकसान झालं आहे. शेतकरी मागच्या कित्येक दिवसांपासून सरकारने पाहणी कसून पंचनामे करावे अशी ओरड करीत आहे. परंतु अद्यात त्यांच्या दुर्लक्ष झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

संत्रा फळबागा खरेदीकडं व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्यानं…

वाशिम जिल्ह्यात मागील 10 वर्षांमध्ये संत्रा बागांचं क्षेत्र 20 पट वाढलंय. 9791 हेक्टर वर संत्रा फळबागांची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी संत्रा फळ बागांमधून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. यंदा मात्र यातील अनेक संत्रा फळबागांवर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संत्रा फळांनी लदबदलेल्या झाडावरील 60 ते 70 टक्के फळं लाल, काळी पडली असून अनेक फळं खाली गळून पडत आहेत. या संत्रा फळबागा खरेदीकडं व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्यानं या फळबागा विना तोडणीच्या जशाच्या तशा पडून आहेत.

लाखो रुपयांचं नुकसान

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या आठदिवसांपासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह झोडपून काढले आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामावरती झाला आहे. त्याचबरोबर फळबागांवरती सुध्दा झाला आहे. लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे नेमकं काय करावं ? अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

हे सुद्धा वाचा
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.