Success Story :  शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत.उत्पादन वाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल त्याने स्वीकारला आहेच पण जी करार शेती स्वप्नवत होती त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ लागली आहे. असाच एक प्रयोग जिल्ह्यातील शिराढोण सारख्या खेडेगावात शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे घटते उत्पादन यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट आयुर्वेदिक औंषध कंपनीशी करार केला.

Success Story :  शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!
औषधी चिया बियाणांचे क्षेत्र मराठवाड्यात वाढत आहे.
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 3:57 PM

उस्मानाबाद : शेतकऱ्यांनी (Traditional farming) पारंपरिक शेतीच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत.उत्पादन वाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल त्याने स्वीकारला आहेच पण जी करार शेती स्वप्नवत होती त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ लागली आहे. असाच एक प्रयोग जिल्ह्यातील शिराढोण सारख्या खेडेगावात शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे घटते उत्पादन यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट (Ayurvedic medicines) आयुर्वेदिक औंषध कंपनीशी करार केला. एक नाही गावातील 20 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा अनोखा उपक्रम केला होता. ज्या चियांची अधिकची मागणी आहे त्याचीच शेतकऱ्यांनी लागवड करुन आता त्याचा पूरवठा थेट तृप्ती हर्बल औषध कपनीला केला जाणार आहे.

काय होते आणि काय झाले?

मराठवाड्यातील शेतकरी म्हणलं की खरीप आणि रब्बी हे दोन हंगामाच समोर येतात. मात्र, गेल्या काही वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील असमतोल यामुळे वर्षभर कष्ट करुनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही ही मराठवाड्यातील स्थिती आहे. त्याचप्रमाणे कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शेतकरीही रब्बी हंगामात गहू, हरभऱा आणि ज्वारीचे उत्पादन घेत होते. मात्र, यामुळे पिकांवर केलेला खर्चही पदरी पडत नाही शिवाय मेहनत वायाच अशीच अवस्था. त्यामुळे या गावच्या 20 शेतकऱ्यांनी एकत्र येत अनोखा उपक्रम राबवला. 20 शेतकऱ्यांनी एकत्र येत तृप्ती हर्बल या आयुर्वेदिक औषेध कंपनीशी करार करुन तब्बल 24 एकरात चिया तर 4 एकरात अश्वगंधाची लागवड केली आहे.

10 हजाराच्या बदल्यात सर्वकाही

औषध कंपनीच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी चिया आणि अश्वगंधाचे उत्पादन घेण्याचे ठरवले. तर कंपनीनेही रीतसर करारात प्रत्येक शेतकऱ्याकडून 10 हजार रुपये जमा करुन घेत पेरणीसाठी लागणारे बियाणे, जैविक औषधे, खतांचा पुरवठा एवढेच काय शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळावे म्हणून मार्गदर्शनही केले. आता निघालेले उत्पादन हे कंपनी मार्फत विकले जाणार आहे. शेतकऱ्यांचे क्षेत्र आणि सर्वकाही औषध कंपनीचे या माध्यमातून शिरढोण येथील 20 शेतकऱ्यांनी अनोखा उपक्रम समोर ठेवला आहे.

शिराढोणचे हे आहेत बहाद्दर शेतकरी

पीक पध्दतीमधील बदल यापुढे एक पाऊल टाकत शिराढोण येथील नामदेव माकोडे, सुदर्शन माकोडे, सविश खोत, अरुण कणसे, रणजित परदेशी, कल्पेश परदेशी, संजय यादव पाटील, रत्नदीप यादव, बालाजी गुमाणे, आरफात डांगे यांनी हा उपक्रम राबवला आहे. सध्या दोन्ही औषध उत्पादने बहरात आहेत. यामधून शेतकऱ्यांच्या उत्पदनात वाढ तर होणार आहे पण आगामी काळात या पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

यंदाचं काय घेऊन बसलावं, 4 वर्षापूर्वीच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत गंगाखेडचे शेतकरी, आता उपोषणाचे अस्त्र

Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले

E-Pik Pahani : कृषी विभाग बांधावर, जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.