हा कांदा आहे की, कांदोबा; वजन सरासरी इतके ग्रॅम, चर्चा या कांदा उत्पादकाची
कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्यामध्ये भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे एका कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो इतका भरत आहे.
सांगली : अबब! कांदा की कांदोबा. तब्बल पाऊण किलो वजनांचे कांदे. पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये तब्बल पाऊण किलो वजनाच्या कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र जिल्ह्यात या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच चर्चा रंगली. राज्यात सध्या कांद्याच्या गडगडलेल्या दरामुळे कांद्यावरून राजकारण पेटले आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. सांगलीतील एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये तब्बल पाऊण किलो वजनाच्या कांद्यांचे उत्पादन घेतले आहे. हा पाचशे ते सातशे ग्रॅमचा कांदा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या कांद्याचे आम्हाला बीजायत मिळेल काय, यासाठी या कांद्याला चांगली मागणी आली आहे. बीड कुठून आणलं होतं. आमच्यासाठी अशा कांद्याचं बीजायत द्या, अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहेत.
कांद्यावरून राजकारण पेटले
राज्यात सध्या कांदा चर्चेत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात हा कांदा पाणी आणत आहे. चक्क दोन रुपये इतका 500 किलो कांदा विकून हातात पैसे मिळतात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी भलताच अडचणीत आला आहे. यानंतर राज्यात कांद्यावरून राजकारण देखील पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कांद्यावरून आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या गडगडलेल्या दरामुळे कांदा हा चांगला चर्चेत आला आहे.
कांदा की, कांदोबा
पण त्याच बाजूला सांगलीच्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र कौतुक होत आहे. कारण कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्यामध्ये भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे एका कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो इतका भरत आहे. सरासरी 700 ते 800 ग्रॅम इतक्या वजनाचा कांदा पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळ येथील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेतीत पीकला आहे. हा कांदा पाहण्यासाठी शिरगावे यांच्या शेतात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतात कांदा पाहण्यासाठी आलेले लोक कांद्याला पाहून, हा कांदा आहे की, कांदोबा,असे आपसूक बोलत आहेत.