शेतकऱ्याच असं जुगाड पाहून तुम्हीही होताल अवाक्, तासाभरातच पडीक जमिनही पेरणी योग्य, वाचा सविस्तर

शेती व्यवसाय बदलाच्या मार्गावर आहे. मात्र, ज्या दगड-गोट्यांमुळे अक्षरश: शेत जमिन ही पडीक राहत होती. यावर शेतकऱ्यानेच पर्याय शोधला आहे. अहो खरंच कळंब तालुक्यातील आंदोरा येथील शेतकरी विनोद तांबारे यांनी यांनी ट्रॅक्टरवर चालणारे जुगाड यंत्र तयार केले आहे.

शेतकऱ्याच असं जुगाड पाहून तुम्हीही होताल अवाक्, तासाभरातच पडीक जमिनही पेरणी योग्य, वाचा सविस्तर
कळंब तालुक्यातील शेतकऱ्याने शेत मिनीवरील दगड-गोटे वेचणीचे यंत्र केले आहे.
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 1:48 PM

उस्मानाबाद : शेती व्यवसयात सर्वात मोठी अडचण ती मजूरांची..दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत असल्याने शेती पडीक क्षेत्रही वाढत आहे. मात्र, काळाच्या ओघात व्यवसयामध्ये यांत्रिकीरणाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे वेळीची बचत आणि अशक्य असे कामही अवघ्या काही वेळात पूर्ण असेच चित्र आहे. यामुळे (Cultivation) शेती मशागतीची, पेरणीची कामे सुकर झाली आहेत. (Agri Business) शेती व्यवसाय बदलाच्या मार्गावर आहे. मात्र, ज्या दगड-गोट्यांमुळे अक्षरश: शेत जमिन ही पडीक राहत होती. यावर शेतकऱ्यानेच पर्याय शोधला आहे. अहो खरंच कळंब तालुक्यातील आंदोरा येथील शेतकरी विनोद तांबारे यांनी यांनी ट्रॅक्टरवर चालणारे (Search for the device) जुगाड यंत्र तयार केले आहे. हे यंत्र शेतातले दगड-गोटे गोळा करते. या यंत्राद्वारे प्रत्यक्ष दगड वेचणीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांची सोय झाली शिवाय तांबारे यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

असे आहे जुगाड यंत्र..

शेत जमिन वहीत करण्यामधला सर्वात मोठा अडथळा हा शेत जमिनीवर असलेले दगड-गोठे. शिवाय याची वेचणी करणेही शक्य नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून जमिनी या पडीकच राहिलेल्या आहेत. यावर तोडगा म्हणून तांबारे यांनी मध्य प्रदेशातील निमज येथून 7 लाख ८० हजार रुपये खर्चुन यंत्र आणले. यंत्र चालवण्यासाठी 60 एच पी ट्रॅक्टर ज्याची किंमत 9 लाख रुपये असा 16 लाख 80 हजाराची यंत्रणा तयार झाली आहे. दगड वेचणी साठी एकरी 2400 रुपये दर आकारत आहेत.

दगड-गोटे वेचणी यंत्र

आतापर्यत शेती मशागतीसाठी एक ना अनेक यंत्रांचा वापर करण्यात आला आहे. मात्र, दगड-गोटे वेचणी करणारे यंत्र शेतकऱ्यांना प्रभावित करणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मार्गी लागलेला आहे. अनेक गावांतील जमिनी मुरमाड आणि दगड आहेत. जमिनीमधील दगड वेचणे मजुरांमार्फत शक्य नाही. शेतकऱ्यांना मजूरी परवडणारे नाही. दगडांमुळे पिके घेण्यास अडचण, पिकाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. यावर पर्याय म्हणून यंत्र प्रभावी राहणार आहे. काही दिवसांपूर्वी हे यंत्र तांबारे यांनी सुरु केले आहे. शेतकऱ्यांकडून याची मागणी होत असून एकरी 2 हजार 400 रुपये आकारले जात आहेत.

कमी वेळेत अधिचे काम

शेती व्यवसयात तशी कष्टाचीच कामे असतात. यामध्ये दगड-गोटे वेचणे हे तर अत्यंत मेहनतीचे काम. याकरिता मजूरही मिळत नाहीत हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. या दगड-गोट्यामुळे अनेक माळरानावरील शेत जमिनीही ह्या पडीक राहिलेल्या आहेत. आता कळंब तालुक्यातून या यंत्राची मागणी होत आहे. हे यंत्र शेतातले दगड-गोटे गोळा करते. या यंत्राद्वारे प्रत्यक्ष दगड वेचणीला सुरुवात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Success Story: दोन युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी, माळरानावर बहरली स्ट्रॉबेरी

Maize Crop: मका पिकामध्ये देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट अन् जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न

Cotton Market: एवढंच राहिलं होत, एकीकडे उत्पादनात घट तर दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून लूट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.