Onion Rate : वाह रे बहाद्दर..! कांदा पाहून व्यापाऱ्यांनी नाके मुरडली, शेतकऱ्यांनी अशी काय शक्कल लढवली की कांद्याचा वांदाच मिटला

गोल्टी कांद्याला 50 रुपये क्विंटल असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना घामाचे तर मोल मिळाले नाहीच उलट पदरमोड करून कांदा विकावा लागते. तरीही अनेक व्यापाऱ्यांनी गोल्टी कांद्याकडे पाठच फिरविली आहे. त्यानंतर मनमाडमधील तरुण व्यापारी फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्याकडील कांदा गोळा केला आणि दोन कंटेनर भरून व्हिएतनामला निर्यात केला.

Onion Rate : वाह रे बहाद्दर..! कांदा पाहून व्यापाऱ्यांनी नाके मुरडली, शेतकऱ्यांनी अशी काय शक्कल लढवली की कांद्याचा वांदाच मिटला
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 10:13 AM

मालेगाव : राज्यामध्ये कांद्याच्या दराचा काय वांदा झाला हे आता नव्याने सांगायची गरच उरलेली नाही. गल्लीपासून राज्याच्या राजधानीपर्यंत (Onion Rate) कांदा उत्पादकांवर काय संकट बेतले आहे त्याची अनुभती दिवसाकाठी तर येतेच पण (Traders) व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा लावली जात आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये मागणी नसल्याने लिलाव देखील झालेले नव्हते. शेतकरी (Onion Arrival) कांदा घेऊन बाजारपेठेमध्ये दाखल झाले तरी व्यापारी त्याकडे पाठ फिरवून बसत असत. असाच प्रकार मनमाड येथे घडला. गोल्टी कांद्याकडे नाक मुरडत व्यापाऱ्यांनी या कांद्याला कवडी मोल भाव दिला होता. शिवाय उपकार केल्यासारखे खरेदी केली होती. मात्र, शेतकऱ्यांची एकजूट काय करु शकते हे या घटनेवरुन समोर आले आहे. कांदा दराबाबतचे सर्व सम दु:खी शेतकरी एकत्र येत त्यांनी कांद्याला मार्केट मिळवून देण्याचा निश्चय केला. त्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा पण गोल्टीच कांदा थेट व्हिएतनामला निर्यात केला. शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलताच त्यांना सर्वांनी हिणवले. मात्र, शेतकऱ्यांचे धाडस आणि हा अनोखा प्रयोग कामी आला आहे. ज्या ठिकाणी गोल्टी कांदा फुकटात देण्याची वेळ आली तिथेच आता 20 किलो असा दर मिळाला आहे तो ही मध्यस्तीविना. शेतकऱ्यांनीच मार्केट हातामध्ये घेतल्यावर काय होऊ शकतंय हे यांनी दाखवून दिले आहे.

शेतकऱ्यांनाच मिळाली व्यापाराची संधी

गोल्टी कांद्याला 50 रुपये क्विंटल असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना घामाचे तर मोल मिळाले नाहीच उलट पदरमोड करून कांदा विकावा लागते. तरीही अनेक व्यापाऱ्यांनी गोल्टी कांद्याकडे पाठच फिरविली आहे. त्यानंतर मनमाडमधील तरुण व्यापारी फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्याकडील कांदा गोळा केला आणि दोन कंटेनर भरून व्हिएतनामला निर्यात केला. त्यामुळे या कांद्याला व्हिएतनामसह इतर देशांत चांगला भाव मिळाला अजून 8 ते 10 कंटेनर पाठविण्यात येणार असल्याचे कच्छी यांनी सांगितले.

गोल्टी कांदा सातासमुद्रापार

मनमाडचे फजल कच्छी, नदीम शेख यांनी शेतकऱ्यांना संपर्क करून कांदा गोळा केला. मुंबई पोर्टवरून कंटेनरद्वारे व्हिएतनामसह इतर देशांत पाठविला. ज्या शेतकऱ्यांना आज गरज आहे त्यांना रोख पैसे दिले तर ज्यांना घाई नाही त्यांना जो भाव मिळेल त्या भावाने पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गोल्टी कांदा येथे 1 ते 2 रुपये किलोने व्यापारी विकत घेतात. तर हाच कांदा व्हिएतनामला 20 रुपये किलोने विकला जातो. यामुळे सर्व खर्च वजा करता शेतकऱ्याला 6 ते 8 रुपये किलोमागे पदरात पडतात.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांनाच घ्यावी लागणार व्यापाऱ्यांची भूमिका

कांद्याचे दर घसरले की सर्वात जास्त बाऊ हा व्यापाऱ्यांकडून केला जातो. ठोक बाजारात पडेल त्या दरात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करायचा आणि किरकोळ बाजारपेठेत तो मनमानी किंमतीने विक्री करायचा. मात्र, शेतकऱ्यांनीच मार्केट हातामध्य़े घेतल्यावर काय होऊ शकते हे मनमाडमध्ये समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर तर मिळलाच पण मंदीत संधी शोधण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.