शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरणाऱ्या बाजार समिती व्यवस्थेला अडचणीत आणण्याचं काम सुरु, जयंत पाटील यांचा केंद्रावर आरोप
जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केंद्र सरकारवर टीका केली. Jayant Patil central government
सांगली: जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार नवे कायदे आणत आहेत. त्यामुळे आपले अधिकार कमी होत आहेत. शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरणारी ही बाजार समिती व्यवस्था आहे. मात्र, या व्यवस्थेला अडचणीत आणण्याचे काम सध्या केंद्र सरकार करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर अंतर्गत आष्टा उपबाजार आवारात केळीच्या सौद्याचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. (Jayant Patil accused that central government thrown ampc’s in trouble)
शेतकऱ्यांचा विश्वास असणारी व्यवस्था अडचणीत
शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरणारी ही बाजार समिती व्यवस्था आहे. मात्र, या व्यवस्थेला अडचणीत आणण्याचे काम सध्या केंद्र सरकार करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. केंद्र सरकारकडून नवनवीन कायदे करुन राज्यांचे अधिकार कमी केले जात आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांचे ट्विट
केंद्र सरकार नवे कायदे आणत आहेत. त्यामुळे आपले अधिकार कमी होत आहेत. शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरणारी ही बाजार समिती व्यवस्था आहे. मात्र या व्यवस्थेला अडचणीत आणण्याचे काम सध्या केंद्र सरकार करत आहे. pic.twitter.com/tT2oRKGAU2
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 23, 2021
आष्टा येथील केळीबाजार शेतकऱ्यांना आधार
कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर अंतर्गत आष्टा उपबाजार आवारात केळीच्या सौद्याचा शुभारंभ करत आज आपण एक पाऊल पुढे टाकले. याआधी हळद खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी सांगलीत पर्याय होता. आष्टा येथेही आपण एक पर्याय व्यापाऱ्यांना दिला. आता केळीच्या व्यवहारासाठीही पर्याय उपलब्ध झाला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
सांगली, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना फायदा
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यापार करणे सोपे होणार आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना एक आधार निर्माण करण्याचे कार्य बाजार समितीने केले आहे, यामुळे सर्व संचालकांचे आभार मानतो, असं जयंत पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या: ‘केंद्र सरकार अडचणीत येतं, तेव्हाच मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकतात’
चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले
(Jayant Patil accused that central government thrown apmc’s in trouble)