Beed : केज कृषी उत्पन्न बाजार समतीवर अखेर प्रशासक, कारणही क्षुल्लक

कारभारातील अनियमिततेचा परिणाम काय असतो याची प्रचिती काय असते याचा प्रत्यय केज बाजार समितीकडे पाहिल्यावर लक्षात येते. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानेच या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहे. बाजार समितीच्या परिसरातील कापूस जिनिंगची उभारणी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवास खर्च चांगलाच अंगलट आला आहे.

Beed : केज कृषी उत्पन्न बाजार समतीवर अखेर प्रशासक, कारणही क्षुल्लक
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 2:48 PM

बीड: कारभारातील अनियमिततेचा परिणाम काय असतो याची प्रचिती काय असते याचा प्रत्यय (Keij Market Committee) केज बाजार समितीकडे पाहिल्यावर लक्षात येते. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानेच या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहे. बाजार समितीच्या परिसरातील (Cotton Ginning) कापूस जिनिंगची उभारणी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवास खर्च चांगलाच अंगलट आला आहे. याबाबत चौकशी करुन (Agricultural Marketing Board) कृषी पणन मंडळाने बाजार समितीकडे खुलासा मागवला होता. मात्र, याबाबत खुलासा समाधानकारक नसल्याचा अभिप्राय हा मंडळाने दिला होता. त्यानंतर मात्र, जिल्हा उपनिबंधकाने बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता बाजार समितीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

बाजार समितीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कापूस जिनिंगमुळे शेतकऱ्यांची तर सोय होतेच पण बाजार समितीला सेस ही मिळतो. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. मात्र, जिनिंगकडून केलेली फीवसुली तसेच बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला प्रवास खर्च यामध्ये अनियमितता आढळून आली होती. यासंदर्भात संचालक भागवत सोनवणे व रामभाऊ गुंड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबत राज्य कृषी पणन मंडळाने समाधानकारक खुलासा नसल्याचा अभिप्राय नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासक नेमण्यात आले आहे.

अहवालात काय आले समोर?

बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश कृषी पणन मंडळाला देण्यात आले होते. त्यानुसार सादर करण्यात आलेल्या अहवालात समितीच्या कार्यक्षेत्रात तब्बल 1 वर्ष विनापरवाना कापूस खरेदी केली होती. या खरेदीवर बाजार शुल्क आकारणीवरुन किती रक्कम वसुल केली याचा खुलासा करण्यात आला नव्हता तर दुसरीकडे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकाच कामासाठी अनेक वेळा प्रवास करुन रक्कम उचललली असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता प्रशासक नेमण्यात आले असून प्रशासक म्हणून आर.एम, मोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संचालक मंडळाचा कार्यकाळही पूर्ण

केज कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळही ऑक्टोंबर महिन्यातच पूर्ण झालेला होता. त्यामुळे पुढील संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा प्रस्तावित होता. मात्र, याच दरम्यान तालुक्यात सेवा सोसायटीच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुका ह्या झालेल्या नाहीत. आता निवडणुका लागेपर्यंत प्रशासकाचीच नेमणूक असणार आहे.

संबंधित बातम्या :

Soybean Market : सोयाबीन स्थिरावले, आता निर्णय शेतकऱ्यांचा? दराचा परिणाम आवकवर

सांगा पिकं जगावयची कशी? 88 वर्षीय आजीबाईंचा महावितरण अधिकाऱ्यांसमोरच टाहो..!

Photo : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा प्रश्न पेटला, कोल्हापूर, सांगलीत आंदोलनानंतर इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.