Beed : गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी आता वन्यप्राण्यांच्या विळख्यात खरिपातील पिके, शेतकऱ्यांना मिळते का भरपाई? वाचा सविस्तर

एकट्या बीड जिल्ह्यामध्ये गोगलगायीच्या प्रादुर्भामुळे तब्बल 3 हजार 600 हेक्टरावरील सोयाबीनचे नुकसान झाले. त्याअनुशंगाने कृषी विभागानेही अहवाल सादर केला आहे. पिकांची उगवण होताच शंकू गोगलगायीने सोयाबीन फस्त करण्याचा घाट घातला होता. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकतरी तब्बल महिनाभर त्रस्त होते. आता गोगलयीचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे.

Beed : गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी आता वन्यप्राण्यांच्या विळख्यात खरिपातील पिके, शेतकऱ्यांना मिळते का भरपाई? वाचा सविस्तर
खरिपातील सोयाबीनला आता वन्य प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 4:40 PM

बीड : यंदा पेरणीपासूनच (Kharif Season) खरीप हंगामावर वेगवेगळे संकट घोंगावत आहे. पेरणी होताच राज्यात पावसाने अशी काय हजेरी लावली की खरिपातील सर्वच पिके ही पाण्यात आहेत. हे कमी म्हणून की काय पिकांची उगवण होताच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयबीनवर (Outbreak of snails) गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला होता. सोयाबीन पिकाची पाने गोगलगायी ह्या फस्त करीत होत्या तर आता पिकांची वाढ झाल्यानंतर (Danger of wild animals) वन्य प्राण्यांचा धोका वाढला आहे. शेत शिवरात हरिण, रानडुकरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सततचा पाऊस आणि वन्यप्राण्यांच्या कचाट्यातून पिकांची सुटका होणार तरी कशी असा सवाल आता शेतकऱ्यांना पडलेला आहे.

मदतीबाबत काय आहे भूमिका?

निसर्गाचा लहरीपणाबरोबरच पिकांना वन्यप्राण्यांचाही धोका वाढत आहे. खरीप आणि रब्बी हंगामातही या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. यामाध्यमातून वन्यप्राण्यांकडून जरी पिकाचे नुकसान झाले तरी त्याची भरपाई ही मिळणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. आता येथून पुढे राज्य सरकारे वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान देखील विचारात घेऊ शकतात.

गोगलगायीने 3 हजार 600 हेक्टरावरील पिकांचे नुकसान

एकट्या बीड जिल्ह्यामध्ये गोगलगायीच्या प्रादुर्भामुळे तब्बल 3 हजार 600 हेक्टरावरील सोयाबीनचे नुकसान झाले. त्याअनुशंगाने कृषी विभागानेही अहवाल सादर केला आहे. पिकांची उगवण होताच शंकू गोगलगायीने सोयाबीन फस्त करण्याचा घाट घातला होता. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकतरी तब्बल महिनाभर त्रस्त होते. आता गोगलयीचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. आता हरिण आणि रानडुकरांकडून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

खरिपात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन

सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. यंदा राज्यात तब्बल 43 लाख हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुनलनेत यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले होते तर यंदा हंगामाच्या सुरवातीपासून पिकांना धोका निर्माण झाला आहे. सुरवातीला अधिकचा पाऊस त्यानंतर गोगलगायीचा प्रादुर्भाव आणि आता वन्यप्राण्यांचा उपद्रव. सततच्या संकटामुळे शेतकरी त्रस्त आहे. यंदा उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक नवनवीन प्रयोग केले पण पावसाने सर्वकाही पाण्यात घातले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.