Washim : शेत शिवारात पाणीच-पाणी, उगवलेली पिके कुजली, तिबार पेरणीचे संकट
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीच पाण्याचा निचरा कसा होईल यावर लक्ष देणे गरजेचे होते. याबाबत कृषी विभागाने सातत्याने जनजागृती केली होती. मात्र, शेतकऱ्यांना एवढा कुठे होणार असे म्हणत याकडे दुर्लक्ष केले. खरिपातील पिके ही पावसाळी पिके असली तरी कायम पाण्यात राहिल्याने नुकसान अटळ आहे. आजही बांधाच्या कडेला आणि वावराच्या मध्यभागी पाणी साचून राहिलेले आहे. शिवाय सततच्या पावसामुळे निचरा करणेही शेतकऱ्यांना शक्य होत नाही.
वाशिम : गेल्या दोन दिवसांपासून (Rain) पावसाचा जोर कमी झाला असला तरी नुकसानीच्या खुणा ह्या कायम आहेत. (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणी होताच राज्यात मान्सून पावसाने धुमाकूळ घातला होता. सगल 10 दिवस पावसाची रिपरीप ही सुरुच होती. त्यामुळे शेतामधून पाण्याचा निचराही झालेला नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने (Crop Damage) पिके सडू लागली आहेत. त्यामुळे गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावली पण तोच पाऊस आता नुकसानीचा ठरत आहे. जिल्ह्यातील 16 महसूल मंडळात 13 ते 15 जुलै दरम्यान झालेल्या पावसाने आजही पिके पाण्यात आहेत. त्यामुळे पिकांच्या वाढीवर तर परिणाम होत आहेच पण उगवताच पावसाचा मारा झाल्याने पिके ही कुजली आहेत. आगोदर पावसाअभावी दुबार पेरणी आणि आता अतिवृष्टीमुळे तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे.
पाण्याचा निचरा होणे गरजेचे
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीच पाण्याचा निचरा कसा होईल यावर लक्ष देणे गरजेचे होते. याबाबत कृषी विभागाने सातत्याने जनजागृती केली होती. मात्र, शेतकऱ्यांना एवढा कुठे होणार असे म्हणत याकडे दुर्लक्ष केले. खरिपातील पिके ही पावसाळी पिके असली तरी कायम पाण्यात राहिल्याने नुकसान अटळ आहे. आजही बांधाच्या कडेला आणि वावराच्या मध्यभागी पाणी साचून राहिलेले आहे. शिवाय सततच्या पावसामुळे निचरा करणेही शेतकऱ्यांना शक्य होत नाही. जुलै महिन्यात खरिपातील पिकांची मशागत असते. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
अतिवृष्टीने खरिपाच्या आशा मावळल्या
संततधार आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा धोका खरिपातील पिकांना झाला नाही. पण जिल्ह्यातील 16 महसूल मंडळात 13 ते 15 जुलैच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस झाला. यामुळे शेत शिवारात पाणी साचून राहिले. पाण्याचा निचरा झाला असता तर पिक वाढीसाठी पोषक वातावरण राहिले असते. पण आता तीन दिवसानंतरही वावरामध्ये पाणी साचून राहिले आहे. सर्वाधिक नुकसान हे सोयाबीन पिकाचेच झाले आहे. कडधान्य पेरणीसाठी उशिर झाल्याने शेतकऱ्यांना उडीद, मूगाला बाजूला सारत सोयाबीनवरच भर दिला होता. आता त्याचेही नुकसान होत असल्याने खरिपाचे नियोजनच बिघडले आहे.
तिबार पेरणीचे संकट
शेतकऱ्यांनी खरीप पेरणीचे मुहूर्त साधत जूनच्या पहिल्या आठवड्यातच चाढ्यावर मूठ ठेवली खरी मात्र, पावसाने सबंध महिना हुलकावणी दिली. त्यामुळे धूळपेरणीचे धाडस शेतकऱ्यांनी केले पण ते वाया गेले. जूनच्या अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावली याच पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी झालेले नुकसान भरुन काढण्याचा निर्धार केला पण गेल्या 10 दिवसांतील पावसाने त्यावरही पाणी फेरले गेले आहे. अतिवृष्टीमुळे तिबार पेरणीचे संकट ओढावले असून शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार आहे.