खरीप हंगामाची लगबग सुरू, कृषी विभागाचं नियोजन, बियाणांची एक जूनपासून विक्री
गेल्यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळं खराब झाला होता. त्याबरोबर रब्बी हंगाम सुध्दा अवकाळी पावसामुळे खराब गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी कर्ज काढली आहे. एक तारखेपासून कृषी विभागाच्या दुकानावर बियाणे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होईल.
धुळे : धुळे (dhule) जिल्ह्यात खरीप पिकाची (Kharif crop) पेरणीसाठी लागणाऱ्या कपाशी पिकाची बियाणे एक जून पासून विक्री होणार आहे. प्रमुख पीक असून कपाशीसाठी 2 लाख 60 हजार 17 क्षेत्रावर कपाशीचा पेरा होणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या (Agricultural department)वतीने 10 लाख 36 हजार बियाणे पाकिटे मागवण्यात आली आहेत. त्याचं वाटप एक जूनपासून होणार आहे, अशी माहिती कृषी अधिकारी कुर्बान तडवी (kurban tadavi)यांनी दिली आहे. जून महिन्यात राज्यात सगळीकडे पाऊस सक्रीय होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. काही जिल्ह्यात पावसाळ्यापुर्वीचं पेरणी झाली आहे. शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत.
खरीप हंगामाची लगबग सुरू
खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे, त्यासाठी आता कृषी विभागाने नियोजन केलं आहे. प्रमुख पीक असलेल्या कपाशीसाठी 10 लाख 36 हजार पाकिटांची मागणी शासनाच्या वतीने करण्यात आली होती, त्यानुसार ही सर्व बियाणे उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांना एक जूनपासून त्याची विक्री केली जाणार आहे. यापूर्वीच काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर कपाशीची पेरणी केली असली, तरी कृषी खात्याच्यावतीने मात्र एक जून नंतरच अधिकृत कपाशीचे बियाणे विक्री केली जाणार आहे. जिल्ह्यात दोन लाख सात हजार इतक्या क्षेत्रावर कपाशीच्या पेरणीचे नियोजन असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी कुर्बन तडवी यांनी सांगितलं आहे.
गेल्यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचं नुकसान
गेल्यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळं खराब झाला होता. त्याबरोबर रब्बी हंगाम सुध्दा अवकाळी पावसामुळे खराब गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी कर्ज काढली आहे. एक तारखेपासून कृषी विभागाच्या दुकानावर बियाणे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होईल.