Kharif Season : आगामी 3 वर्षात वाढणार सोयाबीन, कापसाचे उत्पादन, राज्य सरकराचे धोरण काय ?

यंदाच्या अर्थसंकल्पातच खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खरिपातील कापूस, सोयाबीन, भुईमूग.सुर्यफूल, करडई, मोहरी आणि तीळ या तेलहबियांची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर मूल्यसाखळी विकासासाठी 3 वर्षासाठी विशेष कृषी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधील 60 टक्के निधी हा केवळ कापूस आणि सोयाबीनवरच खर्ची केला जाणार आहे.

Kharif Season : आगामी 3 वर्षात वाढणार सोयाबीन, कापसाचे उत्पादन, राज्य सरकराचे धोरण काय ?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घट झाली आहे.
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 1:09 PM

पुणे : उत्पादनाच्या दृष्टीने (Kharif Season) खरीप हंगाम महत्वाचा आहे. आणि यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा महत्वाचे पीक आहे. काळाच्या ओघात या दोन्ही पिकांच्या क्षेत्रफळात वाढ होत आहे. पण उत्पादनही वाढावे म्हणून आता (State Government) राज्य सरकराने एक वेगळे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आगामी 3 वर्षात या दोन्ही पिकांचे उत्पादन वाढणार त्यादृष्टीने धोरण आखण्यात आले आहे. देशात प्रमुख पिकांच्या (Production) उत्पादकतेमध्येच घट आढळून येत आहे. त्यामुळे योग्य तंत्रज्ञानाचा वापर, शिवाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवण्यासाठी या विशेष कृती योजनेस 3 वर्षासाठी 1 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही मिळाली आहे.

या पिकांसाठी आहे तरतूद

यंदाच्या अर्थसंकल्पातच खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खरिपातील कापूस, सोयाबीन, भुईमूग.सुर्यफूल, करडई, मोहरी आणि तीळ या तेलहबियांची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर मूल्यसाखळी विकासासाठी 3 वर्षासाठी विशेष कृषी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधील 60 टक्के निधी हा केवळ कापूस आणि सोयाबीनवरच खर्ची केला जाणार आहे. शिवाय ज्या तालुक्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाची उत्पादकता कमी आहे त्यांची निवड करुन योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

उत्पादनवाढीसाठी कोणते प्रयत्न होणार

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीच्या दृष्टीने कापूस आणि सोयाबीन ही पिके महत्वाची आहेत. त्यामुळे या पिकांचे उत्पादन वाढवायचे म्हणल्यावर विविध खते अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मंजूर निधी हा कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणासाठी वापरला जाणार आहे. तर 40 टक्के निधी मुल्यसाखळी म्हणजेच साठवणूक सुविधा, प्रक्रिया संच, क्लिंनिंग ग्रीडींग या बीबींसाठी वापरला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना करावा लागणार तंत्रज्ञानाचा वापर

उत्पादनवाढीसाठी तालुक्यातील शेतकरी जे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात तेच तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचवले जाणार, गावनिहाय शेतकऱ्यांचे गट तयार करुन त्यांना पीक प्रात्याक्षिके करुन दाखविले जाणार आहेत.शेती शाळा, क्षेत्रीय भेटी या माध्यमातून उत्पादन तंत्रज्ञान पोहचविले जाणार आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.