वर्षाला 55 हजार रुपयांचं आर्थिक उत्पन्न वाढणार, जाणून घ्या सरकारच्या नव्या योजनेबाबात
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी गायीच्या शेणाने पेंट बनवण्यात येत आहे.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी गायीच्या शेणाने पेंट (Farmers Get Extra Income From Cow Dung) बनवण्यात येत आहे. स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लवकरच एक वैदिक पेंट लाँच केले जातील. या पेंटमध्ये अनेक विशेषता असेल. या पेंटने पर्यावरणाचा स्तर चांगला हाईल. त्याशिवाय देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल (Farmers Get Extra Income From Cow Dung).
वर्षाला 55 हजार रुपये आर्थिक उत्पन्न वाढणार
सरकारने गायीच्या शेणापासून पेट तयार केलं असून मोठ्या प्रमाणात याचं उत्पादनही केलं जाणार आहे. पेंटमध्ये गायीच्या शेणाचा वापर केल्याने गायीच्या शेणाची मागणीही वाढेल. हे शेण शेतकरी आणि गौशाला आणि गावकऱ्यांकडून थेट विकत घेतलं जाईल. यामुळे शेतकरी गायीचं शेण विकू शकतील, त्यातून त्यांच्यासाठी उत्पन्नाचा नवा मार्ग खुला होईल.
यामुळे शेतकऱ्याच्या वार्षिक उत्पन्नात तब्बल 55 हजार रुपयांची वाढ होईल, असा दावा सरकारने केला आहे. शेण खरेदी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांशी संपर्क साधेल.
राज्य सरकार शेण खरेदी करणार
सरकार गायीचं शेणाचं सामान किंवा खाद इत्यादीला चालना देण्यासाठी शेण खरेदी करणार आहे. इतकंच नाही तक छत्तीसगड सरकारने यासाठी एक योजनेची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांकडून गायीचं शेण विकत घेतलं जाईल. नुकतंच छत्तीसगड सरकारने गोधन न्याय योजनेची सुरुवात केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून गुरेढोरे पाळणाऱ्यांकडून सरकार शेणखत खरेदी करते आणि त्यांना प्रति किलोमागे 2 रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकरी आणि गोपालन करणाऱ्यांना अधिकचं उत्पन्न मिळेल. सरकारच्या या योजनेचं कौतुक करण्यात येत आहे. केंद्र सरकार इतर राज्यांमध्येही हा मॉडेल लागू करण्याची शक्यता आहे (Farmers Get Extra Income From Cow Dung).
शेणाचेही पैसे मिळणार
गेल्या अनेक वर्षांपासून शेण आणि गोमुत्रापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले जातात. बाजारात अनेक असे प्रोडक्ट आहेत जे गायीच्या शेणाने किंवा गोमुत्राने तयार करण्यात आले आहेत. जर सरकार स्वत: शेणापासून प्रोडक्ट तयार करण्यावर भर देत असेल तर इतर कंपन्याही त्यावर काम करतील. यामुळे शेणाची मागणी वाढेल आणि त्याचा फायदा शेतकरी, गोशाला, डेअरीचा व्यापार करणाऱ्यांना होणार आहे.
रोजगार वाढणार
गायीच्या शेणाने प्रोडक्ट, खत इत्यादी बनवणारी इंडस्ट्री यशस्वी होते तर इतर लोकांना रोजगाराची संधीही मिळते. ज्याप्रमाणे छत्तीसगड सरकारने गावांमधून शेण खरेदी करण्यासाठी गोठ्यांची निर्मिती केली आहे. सरकार आता आणखी पाच हजार गोठे उघडणार आहे, यामध्ये लोकांना रोजगार मिळणार आहे.
कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवा, लेमन ग्रासची शेती करा आणि पाच वर्ष कमवाhttps://t.co/Y58LKV1HRE#LemonGrass #LemonGrassCultivation #PMModi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
Farmers Get Extra Income From Cow Dung
संबंधित बातम्या :
मराठी शेतकऱ्यांपेक्षा चिनी शेतकरी श्रीमंत का? वाचा इथं उत्तर !
‘कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय’
पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 86 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरी झाडांची लागवड