Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Pik Pahani :’ई-पीक पाहणी’मुळे पीक पेऱ्याची नोंदणी थेट शासन दरबारी, सोपी अन् सहज असलेली प्रक्रिया जाणून घ्या..!

'ई-पीक पाहणी'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेला पेरा थेट शासनाकडे नोंदवला जाणार आहे. त्याअनुशंगाने कोणत्या पिकाचे किती क्षेत्रावर उत्पादन घेतले आहे. शिवाय शेतकरी नुकसानभरापईसाठी पात्र आहे. राज्यात पीकपेरा किती आदी बाबींची माहिती ही सरकारला राहणार आहे.गत खरीप हंगामात ‘ई-पीक पाहणी’ ही प्रणाली नवखी असतानाही या माध्यमातून राज्यात सर्वाधिक पिकांच्या नोंदी ह्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या.

E-Pik Pahani :'ई-पीक पाहणी'मुळे पीक पेऱ्याची नोंदणी थेट शासन दरबारी, सोपी अन् सहज असलेली प्रक्रिया जाणून घ्या..!
ई-पीक पाहणी
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 3:37 PM

लातूर : शेतकऱ्यांच्या पिकांची अचून नोंद ही शासन दरबारी व्हावी या उद्देशाने गेल्या वर्षीपासून सुरु करण्यात आलेली (E-Pik Pahani) ई-पीक पाहणीच्या यंदाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अगदी (Mobile App) मोबाईल अॅपपासून हा बदल असला तरी प्रक्रिया मात्र, सोपी आणि शेतकऱ्यांच्या सहज लक्षात येईल अशीच आहे. 1 ऑगस्ट पासून या प्रक्रियेला राज्यभर सुरवात झाली आहे. यापूर्वी महसूल विभागाच्या माध्यमातून सुरु असलेले हे काम आता शेतकरीच करीत आहे. त्यामुळे तत्परता आणि पीकपेऱ्याचे महत्वही (Farmer) शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. यंदा तर पीकविमा योजनेसाठी शासकीय विमा कंपन्यांचाच समावेश करण्यात आला होता. त्यामुळे नुकसानभरपाई दरम्यान याच ‘ई-पीक पाहणी’नुसार भरपाई देण्याचा निर्णय झाला तरी ही नोंदणी प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची राहणार आहे. सध्या शेत शिवारत ई-पीक-पाहणी करण्याची लगबग ही सरु आहे.

‘ई-पीक पाहणी’चे महत्व काय ?

‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेला पेरा थेट शासनाकडे नोंदवला जाणार आहे. त्याअनुशंगाने कोणत्या पिकाचे किती क्षेत्रावर उत्पादन घेतले आहे. शिवाय शेतकरी नुकसानभरापईसाठी पात्र आहे. राज्यात पीकपेरा किती आदी बाबींची माहिती ही सरकारला राहणार आहे.गत खरीप हंगामात ‘ई-पीक पाहणी’ ही प्रणाली नवखी असतानाही या माध्यमातून राज्यात सर्वाधिक पिकांच्या नोंदी ह्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना त्याचा उपयोगही झाला होता. लाखो शेतकऱ्यांना मदत मिळाली होती.

  1. अशी आहे सुधारित प्रणाली गतवर्षी प्रमाणे यंदाही ई-पीक पाहणी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. असे असले तरी ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या पद्धतीमध्ये मात्र बदल करण्यात आला आहे.
  2. शेतकऱ्यांना ‘प्ले स्टोअर’ मधून ‘ई-पीक पाहणी व्हर्जन 2’ असं नाव टाकून हे अॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. त्यानंतर हे अॅप ओपन केल्यानंतर ई-पीक पाहणी नावाचे होम पेज ओपन होईल. यामध्ये शेतकऱ्यांनी आपला महसूल विभाग टाकून पुढची प्रक्रिया करायची आहे.
  3. यानंतर नवीन खातेदार नोंदणी हा पर्याय निवडावा लागणार आहे. खातेदार होण्यासाठी समोर विचारण्यात आलेली माहीती शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. यामध्ये विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव हे पर्याय निवडावे लागणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यास आपले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. सांकेतिक नंबर टाकून प्रत्यक्ष ई-पीक पाहणी या प्रक्रियेला सुरवात करावी लागणार आहे.
  4. होमपेजवरील पीक माहिती नोंदवा हा पर्याय निवडावा लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यास खाते क्रमांक, गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्र, हंगाम, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, पिकाचा वर्ग, क्षेत्र, जल सिंचनाचे साधन, सिंचन पध्दती, पेरणीची तारिख आदी माहिती भरावी लागणार आहे.
  5. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अक्षांश-रेखांश मिळवावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना आपण निवडलेल्या गटात जाऊन पिकाचा फोटो काढावा लागणार आहे. पिकाचा फोटो अपलोड केला की, सर्वकाही सहमती आहे का ? असे विचारले जाते त्यानुसार ok म्हणले की आपली माहिती अपलोड करीत आहोत थोड्याच वेळात ती पूर्ण होईल असे सांगितले जाते. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर ई-पीक पाहणीही पूर्ण होते.
  6. शिवाय केलेली नोंदणी झाली की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा होम पेजवर यावे लागणार आहे. येथे गावाचे खातेदाराची पीक पाहणी माहिती या पर्यायावर क्लिक केल्यावर आपले नाव जर हिरव्या रंगात आले तर आपली नोंदणी झाले असे समजावे लागणार आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.