सह्याद्रीतील वनस्पतीला राजकारणातील ‘सह्यगिरी’चं नामकरण, कोल्हापूरच्या संशोधकांकडून वेलीला शरद पवारांचं नाव

(Sahyadri Mountain Plant Sharad Pawar )

सह्याद्रीतील वनस्पतीला राजकारणातील 'सह्यगिरी'चं नामकरण, कोल्हापूरच्या संशोधकांकडून वेलीला शरद पवारांचं नाव
शरद पवारांच्या नावे सह्याद्री पर्वतरांगेत वनस्पती
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 1:21 PM

मुंबई : कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्री पर्वतरांगेत नव्या वनस्पतीचा शोध लावला. या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राजकारणातील सह्याद्री अशी ओळख असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव समर्पित करण्यात आले आहे. ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ (Argyreia Sharadchandraji) या नावाने ओळखली जाईल. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल वनस्पतींना पवारांचे नामकरण केल्याचं त्यांनी सांगितले. (Kolhapur Botanist Named Sahyadri Mountain Plant after Sharad Pawar as Argyreia Sharadchandraji)

गारवेल कुळातील ही वनस्पती आहे. डॉ. विनोद शिंपले हे गेली वीस वर्ष या कुळातील वनस्पतींच्या अभ्यासासाठी जगात नावाजले गेले आहेत. आजवर त्यांनी गारवेल कुळातील पाच नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. जगभरात त्यांच्या सशोधनाला मान्यता मिळाली आहे. ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नव्या वनस्पतीचे संशोधन कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या रिडीया या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडून आभार

राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याबद्दल ट्विटरवरुन संशोधकांचे आभार व्यक्त केले.

“सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या एका वनस्पतीचा शोध डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. आता ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाईल. या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असं आदरणीय साहेब मानतात. असा आदर आणि सन्मान केवळ कुटुंबातच होऊ शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन साहेबांच्या नावे समर्पित केले. याचा मला नितांत आदर आहे. धन्यवाद” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

(Kolhapur Botanist Named Sahyadri Mountain Plant after Sharad Pawar as Argyreia Sharadchandraji)

जगभरातील शास्त्रज्ञांकडून नाव मान्य

सह्याद्री पर्वतरांगेतील आलमप्रभू देवराईत या वनस्पतींचा शोध लागला. ही वनस्पती 2016 मध्ये सर्वप्रथम सापडली. तीन वर्षांच्या संशोधनानंतर जगाच्या कोणत्याही भागात असे साधर्म्य आणि वैशिष्ट्य असलेली वनस्पती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संशोधकांना आपल्या नाविन्यपूर्ण शोधाला नाव देण्याचा अधिकार मिळतो. जगभरातील वनस्पती शास्त्रज्ञ या संशोधनाचा अभ्यास करुन संशोधकाने सुचवलेल्या नावावर शिक्कामोर्तब करतात.

काय आहे ही वनस्पती?

डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड यांनी शोध लावलेल्या वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर महिन्यात फुले येतात. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात फळं येतात. ही वनस्पती वेलवर्गीय आहे. तिला पिवळ्या रंगाची मोठी फळं येतात. या पोटजातीच्या वनस्पती मुख्यत्वे आशिया खंडातच आढळतात. आलमप्रभू देवराईत केवळ शंभर वेल असल्याने त्याचे जतन करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधून स्वतःचाच फोटो न्याहाळून पाहतात…

एण्डोस्कोपीमध्ये विश्वविजेते, पद्मश्रीने सन्मान, शरद पवारांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर कोण?

(Kolhapur Botanist Named Sahyadri Mountain Plant after Sharad Pawar as Argyreia Sharadchandraji)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.