Banana : गतवर्षीच्या दराचा परिणाम यंदाच्या फळपिकांच्या लागवडीवर, नंदूरबारमध्ये पीक पध्दतीमध्ये बदल

निसर्गाचा लहरीपणा आणि प्रतिकूल परस्थिती यामुळे पपई व केळी उत्पादनात मोठी घट झाली होती. शिवाय उत्पादित मालही दर्जात्मक नसल्याने त्यालाही कवडीमोल किंमत अशी स्थिती निर्माण झाल्याचा सर्वाधिक फायदा हा व्यापाऱ्यांनी घेतला होता. या फळपिकांची कवडीमोल दरात खरेदी केली जात होती.

Banana : गतवर्षीच्या दराचा परिणाम यंदाच्या फळपिकांच्या लागवडीवर, नंदूरबारमध्ये पीक पध्दतीमध्ये बदल
यंदा नंदूरबार जिल्ह्यामध्ये केळी उत्पादन क्षेत्रात घट होणार आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 11:41 AM

नंदूरबार : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम शेती व्यवसयावर किती दीर्घकाळ राहतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे (Orchard) फळबागांचे घटते क्षेत्र. योजनांच्या लाभातून फळबाग क्षेत्र वाढवण्याचे आवाहन (Agricultural Department) कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात असले तरी शेतकऱ्यांची समस्या ही वेगळीच आहे. गतवर्षी (Unseasonable Rain) अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे केळीसह पपईच्या उत्पादनावर परिणाम परिणाम झाला होता. या दोन्ही फळपिकातून उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही पदरी पडला नव्हता. त्यामुळेच यंदा केळी अन् पपईच्या लागवडीकडे या भागातील शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी पुणे, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून केळीच्या रोपांची मागणी होत असते पण मे महिना सुरु झाला तरी अजून रोपांबाबत विचारणाही होत नसल्याने यंदा केळी आणि पपईचे क्षेत्र घटणार असा अंदाज आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील रोपवाटिका परराज्यात

नंदूरबार जिल्ह्यात केळी आणि पपईचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच या भागात रोपवाटिकाही अधिक आहेत. दरवर्षी येथून मुख्य बाजारपेठेत केळी आणि पपईच्या रोपांची मागणी असते. शिवाय भौगोलिक वातावरण पोषक असल्याने जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यामध्येही या फळपिकांचे क्षेत्र अधिक आहे. पण यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमुळे सरासरी एवढ्या क्षेत्रावर तरी लागवड होते की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. गतवर्षीचे नुकसान आणि घटलेले दर याचा परिणाम यंदाच्या हंगामावर दिसून येत आहे.

शेतकऱ्यांची अडचण, व्यापाऱ्यांची मनमानी

निसर्गाचा लहरीपणा आणि प्रतिकूल परस्थिती यामुळे पपई व केळी उत्पादनात मोठी घट झाली होती. शिवाय उत्पादित मालही दर्जात्मक नसल्याने त्यालाही कवडीमोल किंमत अशी स्थिती निर्माण झाल्याचा सर्वाधिक फायदा हा व्यापाऱ्यांनी घेतला होता. या फळपिकांची कवडीमोल दरात खरेदी केली जात होती. शिवाय उत्पादक शेतकऱ्यांकडे कोणता पर्यायही नसल्याने मागेल त्या किंमतीमध्ये विक्री अशी स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी अडचणीत असताना व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीतून उत्पादनावरील खर्चही शेतकऱ्यांना मिळाला नाही.

यंदा केळी, पपईच्या क्षेत्रात घट

गतवर्षीच्या प्रतिकूल परस्थितीचा परिणाम यंदाच्या फळपिकांच्या लागवडीवर होणार आहे. घटलेले उत्पादन आणि दर यामुळे केळी आणि पपईचे उत्पादन घ्यावे की नाही द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी आहेत. पपईला एकरी 70 हजार रुपये खर्च आहे. याप्रमाणातही उत्पन्न मिळते की नाही यामुळे शेतकरी माघार घेत आहे. निसर्गावर आधारित शेती तर दर बेभरवश्याचे यामुळे फळ बागायतदार शेतकरीही अडचणी आले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.