Success Story : पानमळ्याने फुलले शेतकऱ्यांचे जीवन, 20 गुंठ्यामध्ये 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह

अत्याधुनिक पध्दतीनेच शेती व्यवसाय केला तरच उत्पादनात वाढ होते असे नाही तर योग्य नियोजनही तेवढेच महत्वाचे आहे. पानांची शेती तशी दुर्मिळ होत आहे. शिवाय नव्याने कुणी याकडे लक्ष देत नाही. आता शेतकरी देखील कमर्शियल झाला असून पेरले की लागलीच उत्पादनाची गणिते मांडली जात आहेत. पण नांदेड जिल्ह्यातील बारड परिसरात शेतकरी प्रकाश बोले हे गेल्या 20 वर्षापासून नागेलीच्या पानांची शेती करीत आहेत.

Success Story : पानमळ्याने फुलले शेतकऱ्यांचे जीवन, 20 गुंठ्यामध्ये 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह
नांदेडच्या शेतकऱ्याने 20 गुंठ्यातील पान मळ्यातून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 12:39 PM

नांदेड : अत्याधुनिक पध्दतीनेच (Farming) शेती व्यवसाय केला तरच उत्पादनात वाढ होते असे नाही तर योग्य नियोजनही तेवढेच महत्वाचे आहे. पानांची शेती तशी दुर्मिळ होत आहे. शिवाय नव्याने कुणी याकडे लक्ष देत नाही. आता शेतकरी देखील कमर्शियल झाला असून पेरले की लागलीच उत्पादनाची गणिते मांडली जात आहेत. पण (Nanded) नांदेड जिल्ह्यातील बारड परिसरात शेतकरी प्रकाश बोले हे गेल्या 20 वर्षापासून नागेलीच्या (Leaf Farming) पानांची शेती करीत आहेत. बोले यांचा पान मळ्याचा व्यवसाय हा पारंपरिक आहे. सध्या बोले यांच्या शेतात केवळ 20 गुंठे जमिनीत या नागेलीच्या वेलांची लागवड करण्यात आली आहे. यातून 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे उत्पादवाढीसाठी वेगळी वाट आणि सातत्य ठेवल्यास काय होते हे बोले यांच्या या प्रयोगातून समोर आले आहे.

अशी आहे लागवड पध्दत

20 गुंठे शेतीत सुरुवातीला 5 फुटाचे अंतर ठेवून बेड तयार करण्यात आले होते. या बेडवर शेवरी आणि शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यात आली.शेवरी आणि शेवग्यांची झाडे हे नागिलीच्या वेलांची वरपर्यंत वाढ होण्यास मदत करतात. या झाडांच्या सवलीमुळे पाना सुरक्षा मिळते. दरम्यान महिनाभराच्या अंतराने तयार केलेले नागिलीच्या पानांचे रोपे ही बेडवर लावण्यात येतात. एक ते दीड फूट अंतर ठेवून जुलै महिन्यात या रोपांची लागवड करण्यात आली. जवळपास 6 महिन्यांनंतर या रोपांना नागेलीचे पाने फुटण्यास सुरुवात होते.उत्पन्न सुरू झाल्यास वर्षातून दोन ते दोन वेळेस या वेलांची छाटणी केली जाते.एकवेळ लागवड केल्यास तीन वर्षे या मळ्यातून उत्पन्न मिळत असते.कुठल्याही रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर यासाठी होत नाही.

कमी खर्चात अधिकचे उत्पन्न

पान मळ्याचा व्यवसाय हा पारंपरिक असला तरी यामध्ये आत्याधुनिक पध्दतीचा वापर वाढला आहे. पारंपरिक नागिलीच्या पानांचे पीक ते घेत असल्याने नागिलीच्या पानांची रोपे ते घरीच तयार करतात. यामुळे त्यांच्या खर्चात बचत झाली असून उत्पादनात मात्र, वाढ होत आहे. शिवाय कमी क्षेत्र असल्याने त्याची योग्य प्रकारे निगराणी केली जात आहे. सर्व खर्च वगळता वर्षाकाठी 3 लाख रुपय उत्पन्न मिळत असल्याचे या पान मळ्याचे शेतकरी प्रकाश बोले यांनी सांगितले.

बदलत्या काळातही पानाला मागणी

सध्या गुटख्यामुळे पानांच्या मागणीत घट झाली असली तरी त्या तुलनेत पान मळ्याचे क्षेत्रही मर्यदित आहे. त्यामुळे मागणी अजूनही टिकून आहे. विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकांकडून पानाची मागणी जास्त आहे. बोले यांच्या पानाला मनमाड, भुसावळ सोबतच नांदेड, परभणी,लातूर या जिल्ह्यात मोठी मागणी आहे.20 गुंठ्यांच्या या पान मळ्याच्या शेतीला बोले यांना फक्त 50 हजार रुपये खर्च आला. तर यामधून 3 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळते.

संबंधित बातम्या :

Kharif Season : खत पुरवठ्यापासून पेरणीपर्यंत कृषी विभागाचे नियोजन, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

Sugarcane Fire : महावितरणचा असा हा ‘शॉक’, गतवर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती, उसाचे क्षेत्रही अ्न कारणही तेच

Sangli : ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, वीज कोसळल्याने मेंढपाळासह 10 मेंढ्यांचा मृत्यू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.