एका एकरात दोन लाख रुपयांची कमाई, गवती चहा शेतीतून शेतकऱ्यांना नवी संधी, वाचा सविस्तर

भारतातील शेतकरी आता पारंपारिक शेतीतून बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. lemon grass farmers

एका एकरात दोन लाख रुपयांची कमाई, गवती चहा शेतीतून शेतकऱ्यांना नवी संधी, वाचा सविस्तर
गवती चहा शेती
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 4:03 PM

नवी दिल्ली: भारतातील शेतकरी आता पारंपारिक शेतीतून बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. भारतीय शेतकरी नवनव्या पिकांची लागवड करताना पाहायला मिळतात. देशातील बहुतांश शेतकरी गवतीचहाच्या शेतीकडे वळल्याचं पाहायला मिळतं. लागवडीचा कमी खर्च असल्याने शेतकरी एका एकरामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. (lemon grass farmers earning 2 lakh per year in just one acre know details )

गवती चहामध्ये लिंट्रासचं प्रमाण 80 ते 90 टक्के असतं. या कारणामुळे याचा वास लिंबासारखा येतो. गवतीचहाची शेती करणारे शेतकरी यावर नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत नाही, असं सांगतात. प्राण्यांचा कोणताही त्रास गवती चहाला निसतो. गवती चहाची लागवड केल्यानंतर एकदा त्याची खुरपणी करावी लागते.त्यानंतर वर्षातून चार पाच वेळा पाणी द्यावं लागतं. यामुळे कमी मेहनत आणि जादा आर्थिक उत्पन्न असल्यानं शेतकरी गवती चहाच्या शेतीकडे वळत आहेत.

गवती चहाचा उपयोग काय?

गवती चहाच्या पानांपासून तेल बनवलं जातं. गवती चहाच्या तेलाला जास्त मागणी आहे. औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या गवती चहाची खरेदी करतात. औषध, सौंदर्य प्रसाधन आणि साबण बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्यान आणि सिंट्रालचं प्रमाण असल्यानं याची मागणी कायम असते. कोरोना काळात गवती चहाच्या तेलाचा वापर सॅनिटायझर बनवण्यासाठी देखील होत आहे.

गवती चहाची शेती कुठं होते?

भारतात गवती चहाची शेती केरळ, तामिळनाडू, आसाम,पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांमध्ये होते. देशातील इतर राज्यांमध्ये गवतीचहाच्या शेतीचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. तिथे देखील याची शेती करण्यासाठी प्रोस्ताहन दिलं जात आहे. गवतीचहाच्या शेतीसाठी नाबार्डकडून कर्ज देखील दिलं जाते. गवती चहाची शेती कमी पावसाच्या प्रदेशातही केली जाते.

गवती चहाची शेती कशी केली जाते?

गवती चहाची शेती भात शेतीप्रमाणं केली जाते. याच्या बियांपासून नर्सरीमध्ये रोपं बनवली जातात. त्यानंतर रोपं वाढली की तिथून काढून जमिनीमध्ये लावली जातात. एका हेक्टरवर गवती चहा लावायचा असल्यास त्यासाठी रोपं तयार करण्यासाठी 4 किलो बियाणं लागते.

संबंधित बातम्या:

कोल्हापुरी गुळाला जीआय टॅग मिळालाय, जीआय टॅग का दिला जातो? वाचा सविस्तर

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर बासमती तांदळाचे हे तीन प्रकार, जाणून घ्या काय आहे खास

(lemon grass farmers earning 2 lakh per year in just one acre know details )

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.