शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदीनंतर आता शिंदेही देणार मदत…

दरवर्षी शेतकऱ्यांना वर्षकाठी 6 हजार रुपयांची मदत मिळते. ती मदत शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावर शासनाकडून जमा केली जाते. हीच पद्धत राज्यातही वापरली जाईल अशी शक्यता आहे. राज्यात राबविली जाणारी मुख्यमंत्री किसान योजना लवकरच लागू करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदीनंतर आता शिंदेही देणार मदत...
Farmer Incentive subsidyImage Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 4:11 PM

नाशिक : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी शिंदे सरकारने दिली आहे. केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकार देखील प्रधानमंत्री किसान योजनेच्या (pradhanmantrikisanyojna) धर्तीवर आता मुख्यमंत्री (Eknathshinde) किसान योजना लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तसा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्याच्या नियम आणि अटी काय असणार याबाबत खुलासा केलेला नाही. मात्र, केंद्र सरकारचे (centralgoverment)  सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिंदे सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॉर्म्युला वापरल्याची मोठी चर्चा सुरू झालीय.

दरवर्षी शेतकऱ्यांना वर्षकाठी 6 हजार रुपयांची मदत मिळते. ती मदत शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावर शासनाकडून जमा केली जाते. हीच पद्धत राज्यातही वापरली जाईल अशी शक्यता आहे. राज्यात राबविली जाणारी मुख्यमंत्री किसान योजना लवकरच लागू करण्यात येईल असे आश्वासन दिलेले असले तरी नवीन वर्षापासून याची सुरुवात होईल अशी सुत्रांची माहिती आहे.

शेतकऱ्यांना शेती पीक घेतांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यास शासनाची मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. अशीच मदत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मिळाल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ही योजना जाहीर होताच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून प्रत्येक वर्गाला काहीतरी मदत करण्याची भूमिका असल्याने धडक निर्णय घेतले जात आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून मुख्यमंत्री किसान योजना महत्वाची ठरणार आहे. ही योजना अल्पावधीतच सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्रप्रमाणे नियम असतील तर पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा लवकर मिळू शकते. अन्यथा पुन्हा कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.