Mansoon Updates : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल
शेतीची मशागत करुन पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय.
मुंबई : शेतीची मशागत करुन पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. हवामान खात्यानं याची घोषणा केलीय. त्यामुळे शेतीत पेरणी करुन मान्सूनच्या पावसावर पिक फुलवण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यानं कोकणातील हर्रे परिसरात प्रवेश केलाय. सोलापूर मराठवाड्याच्या संलग्न भागात मान्सून दाखल झालाय (Live Rain Updates Mansoon entered in Maharashtra good news for farmers).
चांगली बातमी मान्सूनची ..??? मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत, द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भाग… परीस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल.. IMD pic.twitter.com/L4ZmSbFlrb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2021
हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मान्सूनविषयी चांगली बातमी आहे. आज (5 जून) मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून रेषा राज्यात दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत आणि मराठवाड्यात काही संलग्न भागात पोहचलाय. सध्याची परिस्थिती मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल आहे.”
राज्यात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग
पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांची शेतीच्या कामांची चांगलीच लगबग सुरू असते. पहिल्या पावसाच्या आधीच शेतं नागंरून पेरणीसाठी ते तयार असतात. त्यातच आता मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांकडून शेती कामाला वेग आलेला दिसत आहे. पहिल्या दमदार पावसानंतर लगेचच पेरणीची कामं सुरू होतील. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांकडून मान्सूनच्या सुरुवातीपासून शाश्वत पाऊस पडो, अशीच इच्छा व्यक्त केली जातेय.
हेही वाचा :
Weather update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज
Yaas Cyclone : पूर्व विदर्भावरही ‘यास’चा परिणाम, चक्रीवादळामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता
जखम असल्यास पावसात जाऊ नका, अन्यथा ‘या’ आजाराचा धोका, बीएमसीचा मुंबईकरांना इशारा
व्हिडीओ पाहा :
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.