Farmer : कर्जमाफी नाही तर कर्ज परतफेड कसली ? सहकार मंत्र्यांकडून एक घाव दोन तुकडे असा निर्णय..!
यंदा महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक दिलासा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्येच महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतून ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नाही त्यांना या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ दिला जाणार आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या सातबारा वरील बोजाही कमी होणार आहे. असे असतानाच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महत्वाची घोषणा केली आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज परतफेडीचा तगादा लावू नये असे आदेश दिले आहेत.
पुणे : यंदा (State Government) महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक दिलासा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्येच महात्मा जोतीराव फुले (Loan waiver) कर्जमुक्ती योजनेतून ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नाही त्यांना या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ दिला जाणार आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या सातबारा वरील बोजाही कमी होणार आहे. असे असतानाच (Minister of Co-operation) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महत्वाची घोषणा केली आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज परतफेडीचा तगादा लावू नये असे आदेश दिले आहेत. शिवाय असे प्रकरण निदर्शनास आल्यास संबंधित बॅंकावर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कर्जमाफी झाल्यात जमा असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक पातळीवर व्याजाची रक्कम अदा केली तरच कर्जमाफीचा लाभ असा अपप्रचार केला जात होता. पण थेट सहकार मंत्र्यांनीच याबाबत सूचना केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना वर्षभरात दिलासा
थकबाकीदारांची कर्जमाफी झाली तर नियमित कर्ज अदा करणाऱ्यांना काय असा सवाल उपस्थित झाला होता. त्या दरम्यान महाविकास आघाडीने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, या निर्णयानंतर लागलीच कोरोनाची लाट आली आणि सरकारचे निर्णय बारगळे होते. त्यामुळे आता अर्थसंकल्पात झालेल्या घोषणे प्रमाणे वर्षभरात या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही 50 हजाराची रक्कम दिली जाणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
अन्यथा सहकार विभागाकडे करा तक्रार
ज्या शेतकऱ्यांची कर्जखाती ही माफीसाठी पात्र ठरलेली आहेत त्यांना आता वसुलीचा तगादा लावता येणार नाही. किरकोळ कारणांनी कर्जमाफी झाली नसेल अशा शेतकऱ्यांनाही त्याची परतफेड करावेच असे नाही. स्थानिक पातळी व्याजाची रक्कम अदा केली तरच योजनेचा लाभ असे म्हणत वसुली केली जात आहे. अशा पध्दतीने बॅंका वसुली करीत असतील तर शेतकऱ्यांनी सहकार विभागाशी संपर्क करुन तक्रार नोंदवता येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बॅंक अधिकाऱ्यांनी काही सांगितले तरी शेतकऱ्यांनी कर्जफेड करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
68 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
कर्जखताच्या पडताळणीसाठी आधार प्रमाणीकरण करण्यात आले होते. यामध्ये 32 लाख 39 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ देणे हे बंधनकारक होते. मात्र यापैकी 31 लाख 71 हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफीची रक्कम अदा करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरीत 68 हजार शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र, या शेतकऱ्यांच्या खात्याबाबत काही त्रुटी असल्या की त्यांना कर्जपरतफेडीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे सहकार मंत्री यांनी स्पष्ट सूचना देऊन हा याबाबतचा संभ्रम दूर केला आहे.
संबंधित बातम्या :
पिंपळगाव बाजार समितीच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांचा फायदा, समितीमधील व्यवहारात आता नियमितता
Nanded : सोयाबीन दर वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना मोबदला चोरट्यांना, भाव वाढताच शेतीमालावरच डल्ला
Nanded : तोडणीअभावी सर्वात मोठ्या नगदी पिकाचे नुकसान, हंगाम अंतिम टप्प्यात तरीही ऊस फडात