Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडातले वास्तव आयुक्तांसमोर : एफआरपी, ऊसाच्या प्रश्न बाजूलाच तोडणी अन् वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूटच

साखर कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक याकरिता अधिकचा दर आकारला जात असल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. एकीकडे शेतकरी अनेक समस्यांचा सामना करीत आहे. यातच ऊसतोडणीसाठी कारखानदारांची मनधरणी आणि एवढे करुनही ऊसतोड कामगारांची मनमानी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

फडातले वास्तव आयुक्तांसमोर : एफआरपी, ऊसाच्या प्रश्न बाजूलाच तोडणी अन् वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूटच
ऊसतोडणी
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 3:08 PM

पुणे : ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन चार महिने होत आहेत. दरम्यानच्या काळात (FRP) एकरकमी एफआरपी, ऊसाचे पाचट नेमके कुणाचे असे प्रश्न प्रकर्षाने समोर आले होते. याबाबतच तोडगा निघाला नसताना आता (Sugarcane Cutting) ऊस तोडणी आणि वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. (Sugar Factory) साखर कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक याकरिता अधिकचा दर आकारला जात असल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. एकीकडे शेतकरी अनेक समस्यांचा सामना करीत आहे. यातच ऊस तोडणीसाठी कारखानदारांची मनधरणी आणि एवढे करुनही ऊसतोड कामगारांची मनमानी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऊसतोडणी सुरु झाली तरी वाहतूक आणि इतर बाबींसाठी शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे आथा सर्व साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी प्रतिनीधींनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

असा होतो शेतकऱ्यांच्या बिलामधून खर्च

कारखान्यातील शेतकी विभागातील कर्मचाऱ्यांचे भत्ते, पगार, फंड तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार, शेती गट कार्यालयांचे भाडे, मुकादम आणि वाहतूकदारांना नियमापेक्षा द्यावा लागणारा भत्ता इत्यादी खर्च शेतकऱ्यांच्या बिलातून केला जात आहे. एवढे असूनही नियमित वेळी ऊसतोडणी होत नाही. तर तोडणीला आलेल्या कामगारांना पुन्हा वेगळा खर्च हा शेतकऱ्यांना करावा लागत आहे. नियमाप्रमाणे असा कोणताही खर्च शेतकऱ्यांवर लादता येत नाही.

लेखापरिक्षकांकडूनच्या तपासणीत घोळ उघड

साखर सहसंचालकांनी विशेष लेखापरिक्षकांची नेमणूक करुन यासंबंधी तपासणी करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार यामध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे. बेकायदेशीर खर्चाच्या रकमा ह्या हिशोबातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कारखान्यांना आगोदरचे हिशोब रद्द करायला भाग पाडून सुधारित दराने एफआरपी देण्याचे आदेश दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. साखर कारखान्यांनी तयार केलेली ऊस तोडणी मजूरांची टोळी, वाहतूकीचा खर्च या बाबींची तपासणी करण्याची मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली आहे.

साखर आयुक्तांच्या भेटील शिष्टमंडळ

स्थानिक पातळीवर ऊसतोडणीपासून ते वाहतूक आणि एफआरपी रकमेबाबत शेतकऱ्यांची लूट होत आहे. शिवाय तोडणी व्हावी या उद्देशाने शेतकरीही अधिकची रक्कम देऊन फडातला ऊस बाहेर काढतो. मात्र, ही लूट आता मोठ्या प्रमाणात वाढली असून संबंधित साखर काखान्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी.पाटील, महेश जाधव, विशाल पाटील, अंकूशचे धनाजी चुडमुंगे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातमी :

ही कसली दुश्मनी? शॉर्टसर्किटमुळे नव्हे तर शेजाऱ्यानेच लावली ऊसाला काडी

शेतकऱ्यांचा नाद खुळा : वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी अनोखी शक्कल, दुहेरी फायदा

Summer Season : उन्हाळी सोयाबीनचा नवा प्रयोग, कसा होईल यशस्वी?

जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?.
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती.
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं.
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार.
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले....
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?.
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल.
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?.
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत.