मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडून शेतकरी बनला, आज लाखो रुपये कमावतो

तकऱ्याचे नाव राघव उपाध्याय असून त्याने आपल्या 10 एकर शेतीमध्ये तब्बल 12 टन काकडीचे उत्पादन घेतले आहे. (farmer cucumber farming)

मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडून शेतकरी बनला, आज लाखो रुपये कमावतो
उन्हाळ्यात आपण काकडीच्या सेवनाने हायड्रेटेड राहता. काकडीमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर यासारखे बरेच पोषक तत्वे असतात.
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 6:11 PM

भोपाळ : नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत. मात्र, तंत्रज्ञान आणि कष्टाचा ताळमेळ साधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने मोठी गामगिरी करुन दाखवली आहे. या शेतकऱ्याचे नाव राघव उपाध्याय (Raghav Upadhyay) असून त्याने आपल्या 10 एकर शेतीमध्ये तब्बल 12 टन काकडीचे उत्पादन घेतले आहे. मध्यप्रदेशातील कालमुखी या छोट्याशा गावात हा शेतकरी आपला शेती व्यवसाय करतो. (Madhya Pradesh engineer farmer Raghav Upadhyay cultivated Cucumber and earned big profit)

डिजिटल मार्केटिंग ऑफिसर ते शेतकरी

मिळालेल्या माहितीनुसार हा शेतकरी मध्य प्रदेशच्या कालामुखी या छोट्याशा गावात राहतो. तो पहिल्यापासून शेती करतो असेही काही नाही. मुंबई सारख्या ठिकाणी एका प्रतिष्ठित कंपनीत या शेतकऱ्याने डिजिटल मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम केलेले आहे. मात्र, लहानपनापासून एका खेड्यात वाढल्यामुळे आणि शेतकरी परिवार असल्यामुळे राघव यांना शेतीचीसुद्धा आवड आहे. त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू न देता तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतात तब्बल 10 ते 12 टन काकडीचे उत्पादन अवघ्या 90 दिवसांत घेतले.

वेगवेगळ्या फळांची शेती

राघव यांना पहिल्यापासूनच शेतीविषयी प्रेम होते. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले असून त्यांना मुंबईमध्ये प्रतिष्ठित अशा कंपनीमध्ये नोकरी लागली होती. मात्र, वेगळं काहितरी करण्याचा उद्देश मनात ठेवून त्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला. त्यांनी आपल्या 10 एकर शेतामध्ये सुरुवातीला काकडीचे उत्पादन घेतले. फक्त 90 दिवसात आधूनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी तब्बल 10 ते 12 टन काकडीचे उत्पादन घेतले. या मोठ्या यशानंतर त्यांनी आपल्या बाकीच्या एक एकर शेतात टरबूज, कारली, काकडी, गिलके अशा विविध फळभाज्या लावल्या. या प्रयोगातसुद्धा त्यांना मोठा फायदा झाला.

वापरले आधूनिक तंत्रज्ञान

दरम्यान, राघव यांनी आपल्या 10 एकर शेतात विक्रमी उत्पादन घेतले असले तरी, त्याआधी शेतीसाठीच्या आधूनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला होता. आधूनिक शेतीचे महत्त्व ओळखून त्यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय वापरला. ठिबक सिंचनामुळे पाणी आणि श्रम वाचतात. तसेच, खर्चसुद्धा कमी होतो. शेती करण्यासाठी त्यांनी देशी तसेच विदेशी वाणसुद्धा वापरली. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतूक केले जात आहे.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर

कृषी वीज धोरण योजनेत नाशिकचं बोकडदरे अग्रेसर, ग्रामस्थांकडून 22 लाखांचा वीज बिल भरणा

अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून इंजिनिअर भारतात परतला, आता बांबू शेतीतून मिळवतोय लाखो रुपये

(Madhya Pradesh engineer farmer Raghav Upadhyay cultivated Cucumber and earned big profit)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.