महाबळेश्वरचीच स्ट्रॉबेरी पाहिजे, मग आता नाही होणार फसवणूक..! कृषी पणन मंडळाचा रामबाण उपाय

केवळ महाबळेश्वरच नाही तर काळाच्या ओघात स्ट्रॉबेरीचे उत्पादन हे वेगवेगळ्या प्रदेशातही घेतले जात आहे. अगदी मराठवाड्यातील डोंगराळ भागातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. मात्र, आजही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चवच न्यारी असल्याने ग्राहकांकडून त्याचीच मागणी अधिक होत आहे. पण बाजारात वेगवेगळ्या भागातील स्ट्रॉबेरी दाखल होत असल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे.

महाबळेश्वरचीच स्ट्रॉबेरी पाहिजे, मग आता नाही होणार फसवणूक..! कृषी पणन मंडळाचा रामबाण उपाय
स्ट्रॉबेरी, संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 2:55 PM

सातारा : केवळ महाबळेश्वरच नाही तर काळाच्या ओघात (Strawberry Production) स्ट्रॉबेरीचे उत्पादन हे वेगवेगळ्या प्रदेशातही घेतले जात आहे. अगदी (Marathwada) मराठवाड्यातील डोंगराळ भागातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. मात्र, आजही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चवच न्यारी असल्याने ग्राहकांकडून त्याचीच मागणी अधिक होत आहे. पण बाजारात वेगवेगळ्या भागातील स्ट्रॉबेरी दाखल होत असल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे. पण आता (Agricultural Marketing Board) कृषी पणन मंडळ कोल्हापूर व प्रक्रिया सहाकरी संस्थांकडून यावर रामबाण उपाय काढला आहे. आता महाबळेश्वर येथे उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या बॉक्सवर क्यूआर कोड प्रणाली सुरु करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. सध्या या अनोख्या उपक्रमात केवळ 10 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असला तरी भविष्यात यामध्ये शेतकरी संख्या वाढणार असल्याचा विश्वास पणन मंडळाला आहे.

क्यूआर कोडने नेमके काय कार्य करणार ?

स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरचीच आहे हे ओळखण्यासाठी या अत्याधुनिक प्रणालीचा उपयोग होणार आहे. या क्यूआर कोडमुळे स्ट्रॉबेरी कुण्या शेतकऱ्याची आहे? स्ट्ऱॉबेरी लागवडीचे ठिकाण कोणते ? या मधील न्यूट्रीशन व्हॅल्यू, स्ट्ऱॉबेरीची तोडणी आणि बॉक्स पॅकिंगची पध्दत एवढेच नाही तर या कोडमुळे जर सेंद्रीय पध्दतीची स्ट्ऱॉबेरी असेल तर त्यासोबत त्याचे प्रमाणपत्रही या कोडच्या माध्यमातून पाहवयास मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पाहिजे तीच स्ट्रॉबेरी मिळणार आहे.

महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीचे प्रयोग आता तरुण शेतकरी करीत आहेत. शिवाय याकरिता पोषक वातावरण तयार करुन उत्पादन घेतले जात आहे. असे असले तरी आजही महाबळेश्वर तालुक्यातच स्ट्रॉबेरीचे अधिकचे उत्पादन घेतले जात आहे. या भागात थंड वातावरण असल्याने स्ट्रॉबेरीला वेगळीच चव आहे. स्ट्रॉबेरीचे आयुष्यमान वाढावे यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. प्रीकुलिंग यंत्रणा, रिपर व्हॅन यासारख्या प्रणालीचा वापर केला जात असल्याने महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात पाठवली जात आहे.

कशामुळे निर्माण झाली गरज?

आजही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला मागणी आहे. कारण या थंड भागातील स्ट्रॉबेरीची चव ही वेगळीच आहे. त्यामुळे अधिकचे पैसे खर्च करुन हीच स्ट्रॉबेरी घेण्याची तयारी ग्राहकांची असते मात्र, बाजारात महाबळेश्वरची स्ट्ऱॉबेरी या नावाखाली कोणतीही स्ट्ऱॉबेरी विकली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. यावर उपाय म्हणून कृषी पणन मंडळ कोल्हापूर व श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्थेकडून ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 10 शेतकऱ्यांचा सहभाग झाला आहे.

संबंधित बातम्या :

Onion: सोलापुरात कांदा आवक स्थिरावूनही शेतकऱ्यांचा फायदाच, शेतीमालाच्या दरात सुधारणा

शेतकऱ्यांसाठी काय पण..! आज फॉर्च्यूनर उद्या बीएमडब्ल्यू मधूनही द्राक्ष विक्री झाली पाहिजे, कोल्हापूरच्या बहाद्दराने वेधले लक्ष

Cotton Production : बाजार समितीचा असा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार अन् बाजारपेठही फुलणार, वाचा सविस्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.