Video : जानकरांचा अंदाजच न्यारा, गाईच्या धारा पिळत सरकारडे एकच नारा
दिवसेंदिवस दुधाच्या प्रमाण हे कमी होत आहे. ज्यामधून अधिकचा फायदाच नाही तो व्यवसाय शेतकरी करतोयच कशाला अशी दुग्धव्यवसयाची स्थिती झाली आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी इंदापूर येथे एका कार्यकर्त्याच्या शेतात जाऊन थेट दूध उत्पादनामागील आर्थिक गणित समजावून घेतले. दुग्ध व्यवसाय शेतीचा मुख्य जोड व्यवसाय आहे. त्यामुळे याचा आधार मिळाला तरच शेतकऱ्यांच्या उत्पदनात वाढ होणार आहे.
इंदापूर : राजकीय नेत्यांचे शेतीला घेऊन वेगवेगळे अंदाज समोर येऊ लागले आहेत. नाथाभऊ यांनी तब्बल 50 एकरात खजुराची शेती केली असल्याचे समोर येताच माजी दुग्धमंत्री तथा रासपचे अध्यक्ष यांचा वेगळाच अंदाज आता समोर आला आहे. महादेव जानकर हे माजी दु्ग्धमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना (Milk Rate) दूध दराबाबत सर्वकाही ज्ञात असल्याने त्यांनी (Cow Milk) गाईच्या दूध दरात वाढ करण्याची मागणी (State Government) राज्य सरकारकडे केली आहे. शिवाय गाईची धार काढत-काढत त्यांनी ही मागणी केली असल्याने त्याला वेगळे असे महत्व प्राप्त झाले आहे. गाईच्या दुधाच्या फॅट हे 3/5, 8/5 या प्रमाणात मोजले जाते. त्यानुसार दूधाला प्रति लिटर 50 रुपये देण्याची मागणी त्यांनी केली.
इंदापूर : महादेव जानकर यांचा अनोखाच अंदाज pic.twitter.com/AXl2e1cq5A
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi Live (@tv9_live) May 22, 2022
असे आहे दूध उत्पादनाचे अर्थकारण
दिवसेंदिवस दुधाच्या प्रमाण हे कमी होत आहे. ज्यामधून अधिकचा फायदाच नाही तो व्यवसाय शेतकरी करतोयच कशाला अशी दुग्धव्यवसयाची स्थिती झाली आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी इंदापूर येथे एका कार्यकर्त्याच्या शेतात जाऊन थेट दूध उत्पादनामागील आर्थिक गणित समजावून घेतले. दुग्ध व्यवसाय शेतीचा मुख्य जोड व्यवसाय आहे. त्यामुळे याचा आधार मिळाला तरच शेतकऱ्यांच्या उत्पदनात वाढ होणार आहे. गाईला दिवसभर लागणारा चारा, वैरणी आणि खुराक याचा विचार करिता गाईच्या दुधाला 50 रुपये लिटर दर मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना हा व्यवसाय परवडणारा आहे. शिवाय वाढीव दर मिळाल्याशिवाय दूध व्यवसाय वाढणारही नाही हे देखील तेवढेच खरे आहे.
महादेव जानकरांचे राज्य सरकारला साकडे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना जानकर यांनी विनंती केलेली आहे की, गायीच्या 3/5 व 8/5 या दुधाला एका लिटर ला कमीत कमी 50 रुपये दर मिळाला पाहिजे, तरच शेतकरी जगतील व त्याचे कुटुंब तो व्यवस्थित जगवेल, दुधाचा धंदा हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे, दुधाला दर चांगला भाव मिळाला तर शेतकरी उद्योग प्रिय बनेल त्यामुळे सध्याच्या मायबाप सरकारने शेतकऱ्याची गाईच्या दुधाला योग्य दर द्यावा अशी मागणी यावेळी गाईचे दूध काढत काढत जानकर यांनी केली आहे.
पशूखाद्य दरात वाढ
दूध दरात वाढ झाली तरी वर्षातून एकवेळेस आणि ते ही 2 किंवा 3 रुपयांनी. दूध दर हे कासवगतीने वाढत असले तरी दुसरीकडे पशूखाद्याच्या दरात दर 2 महिन्यातून वाढ ही ठरलेलीच आहे. पशूखाद्यमध्ये पेंड, सुग्रास, कांडी, कळणा यासारख्या बाबींचा समावेश होतो. 50 किलोच्या खाद्यासाठी शेतकऱ्यांना 1 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय हिरवा चारा आणि शेतकऱ्यांची मेहनत याचा विचार करता किमान 60 ते 70 रुपये प्रति लिटर दर असणे ही काळाची गरजच झाली आहे.
इंदापुरातील कार्यकर्त्याच्या गोठ्यात महादेव जानकर
कार्यकर्त्यासमवेत शेती कामे करताना रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे सातत्याने दिसत असतात. शिवाय अचानकच वेगळा निर्णय घेऊन ते कार्यकर्त्यांना आणि इतरांना आश्चर्याचा धक्काही देतात. त्याच प्रमाणे ते इंदापूर येथील एका कार्यकर्त्याच्या गोठ्यात गेले होते. दरम्यानच्या वेळात त्यांना दुग्धव्यवसयाचे अर्थकारण समजावून घेतले. यावेळी गाईच्या दुधाला घेऊन त्यांनी रास्त मागणी सरकारकडे केली आहे.