कृषी मंत्र्यांची समयसूचकता, मास्क नसलेल्या शेतकऱ्याला स्वत:जवळचा रुमाल दिला, मास्क म्हणून वापरण्याचा सल्ला
महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दादा भुसे यांनी शिंदखेडा तालुक्यात शेतकरी भेट दौरा सुरू केला आहे.सोंडले गावात शेतकरी यांच्या विविध समस्यावर जाणून घेण्यासाठी भेटी दिल्या.
धुळे: महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दादा भुसे यांनी शिंदखेडा तालुक्यात शेतकरी भेट दौरा सुरू केला आहे.सोंडले गावात शेतकरी यांच्या विविध समस्यावर जाणून घेण्यासाठी भेटी दिल्या. कृषी विभागाच्या कार्यक्रमामध्ये एका शेतकऱ्याकडे मास्क नसल्याने थेट कृषी मंत्री दादा भुसे यांनी आपला खिशातील रुमाल दिला शेतकऱ्याला मास्क म्हणून दिला. (Maharashtra Agriculture Minister Dada Bhuse gave his handkerchief to farmer who dont have Mask)
कृषी मंत्री उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांचा धुळे व नंदूरबार जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला होता. दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना तसेच विविध पद्धतीने शेतकऱ्यांना मिळणारे लाभ यांच्यावर थेट शेतकऱ्यांशी भेट घेत चर्चा करण्यात आली.
सोडले गावात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा कार्यक्रम
शिंदखेडा तालुक्यातील सोडले या गावात दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजना त्यातील त्रुटी कशा दूर करता येतील. पारंपारिक शेती बरोबर आधुनिक शेती संदर्भात कशा पद्धतीने उपाय योजना राबवल्या गेल्या पाहिजेत याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला का शेतकऱ्यांना दादा भुसे यांनी कोरोनाच्या पर पार्श्वभूमीवर मास्क बंधनकारक असून मास्क लावण्यासंदर्भात सूचना केल्या परंतु एका शेतकऱ्याकडे मास्क नसल्याने थेट दादा भुसे यांनी आपल्या खिशातील रुमाल काढून शेतकऱ्यांना तोंडाला बांधण्यासाठी दिला.
कृषीमंत्र्यांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांना सुखद धक्का
राज्याचे कृषी मंत्री थेट शेतकर्यांशी भेटीगाठी घेत चर्चा करत असल्यान शेतकऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. नाशिक धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे या जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज खानदेशातील या जिल्ह्यात दौरा सुरू केला आहे. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी चर्चा करत कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाबाबत माहिती देत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले शेतकऱ्यांनी खचून न जाता हिम्मत धरावी राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं दादा भुसे म्हणाले. तुम्हाला खते बी-बियाणे संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल, असा दिलासा देखील शेतकऱ्यांना कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
इतर बातम्या:
ईडीची नोटीस का आली? जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? सातारा जिल्हा बँकेचा महत्वाचा खुलासा
(Maharashtra Agriculture Minister Dada Bhuse gave his handkerchief to farmer who dont have Mask)