हापूस आंब्याला सर्वाधिक दर का मिळतो? हापूसला इंग्रजी नाव अल्फान्सो कसं मिळालं?
राज्यात कोरोनाची लाट असली तरी फळांचा राजा हापूस आंब्याची मागणी वाढली आहे. Maharashtra alphonso mango
नवी दिल्ली: राज्यात कोरोनाची लाट असली तरी फळांचा राजा हापूस आंब्याची मागणी वाढली आहे. कोकणातील हापूस आंब्याचे अनेक चाहते आहेत. हापूस आंब्याला तर थेट परदेशातूनसुद्धा मागणी आहे. देवगडचा हापूस अंबा असो किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा हे आंबे कितीजरी महागडे असले तरी लोक ते आवडीने खरेदी करतात. हापूस आंब्याची जपान, कोरिया आणि यूरोपमधील देशांमध्ये निर्यात केली जाते. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये याची मागणी वाढत आहे. हापूस आंब्याला जीआय टॅग देखील मिळाला आहे. (Maharashtra alphonso mango so expensive costly know full details)
हापूसला अल्फांन्सो नाव कसं मिळालं?
हापूस आंब्याला इंग्रजीमध्ये अल्फांसो म्हटलं जातं. अल्फांन्सो नाव कसा मिळालं याचा इतिहास देखील गमतीशीर आहे. अल्फांन्सो नाव पोर्तुगीज युद्ध रणनीतीकार अफोंसो अल्बूकर्क याच्या नावावरुन पडलं आहे. अफोंसो दि अल्बूकर्कला बागा लावण्याचा छंद होता. गोव्यात ज्यावेळी पोर्तुगीजांचं राज्य होतं त्यावेळी त्यानं आंब्यांची झाडं लावली होती. इंग्रजांना हे काम आवडलं होतं. अखेर अफोंसो दि अल्बूकर्क याच्या स्मरणार्थ अल्फान्सो हे नाव ठेवण्यात आलं आजही युरोपामध्ये अल्फान्सो म्हणजेच हापूस प्रसिद्ध आहे.
हापूसला सर्वाधिक दर
हापूस आंब्याला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. किरकोळ बाजारात काही ठिकाणी हापूस आंबा 2 हजार रुपये डझनला विकला जातो. मात्र, उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्यापैकी 90 टक्के आंब्याची निर्यात केली जाते.
हापूस आंब्याची वैशिष्ट्ये
हापूस आंब्याचं वजन 150 ते 300 ग्रॅमच्या दरम्यान असतं. हा आंबा गोडी, सुगंध याबाबतीत इतर आंब्यापेक्षा वेगळा असतो. हापूस आंबा पिकल्यानंतर एक आठवड्यापर्यंत चांगला राहतो. यामुळे हापूस आंब्याची निर्यात करण्यात अडचण येत नाही. हापूस आंबा सर्वाधिक महाग आंबा म्हणून ओळखला जातो.हा आंबा किलोवर विक्री न होता डझनच्या मापात विक्री केला जातो. दिल्ली सारख्या शहरात हापूस आंब्याची विक्री किलोवर केली जाते.
हापूस आंबा ओळखण्यासाठी आता खास GI टॅग, देवगडच्या शेतकऱ्यांचा खास उपक्रमhttps://t.co/RmjLk3Gzng#Mango |#Hapus | #Hapusmango
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2021
संबंधित बातम्या:
हापूस आंबा ओळखण्यासाठी आता खास GI टॅग, देवगडच्या शेतकऱ्यांचा खास उपक्रम
सांगलीत मुहूर्ताच्या आंब्याचे आतषबाजीने स्वागत, रत्नागिरीच्या हापूस पेटीला मिळाले….
(Maharashtra alphonso mango so expensive costly know full details)