ओरिजनल हापूस कसा ओळखणार? कोकणातील बागायतदारांचा मॉडर्न फंडा, प्रत्येक आंब्यावर क्युआर कोड
हापूस मध्ये होणारी भेसळ रोख्यासाठी कोकणातील आंबा बागायतदारांनी नवा फंडा आणलाय. QR Code to Alphonso Mango
रत्नागिरी: हापूस मध्ये होणारी भेसळ रोख्यासाठी कोकणातील आंबा बागायतदारांनी नवा फंडा आणलाय. आता हापूसला क्युआर कोड लावला जाणार असूनन ओरिजनल हापूस आता ग्राहकांना मिळणार आहे. रत्नागिरीतील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्या. यांनी ही संकल्पना सुरु केलीय.त्यामुळे आता क्यूआर स्टीकर असलेले आंबे लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. ( Maharashtra Alphonso producer farmers stick QR Code to Alphonso Mango)
कोकणच्या आंब्याला दोन वर्षापूर्वी हापूस नावाने भौगोलिक निर्देशांक (जीआय टॅग) प्राप्त झाले त्यामुळे ,रत्नागिरी ,सिंधुदूर्ग ,रायगड ,पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यातील आंबा हा हापूस नावाने विकला जाईल.अन्य ठिकाणच्या आंब्याला हापूस म्हणता येणार नाही. जीआय सर्टीफिकेट शेतक-यांना देण्यात आलेय. परंतु, परराज्यातून येणारा आंबा हा हापूस नावाने विकला जात होता. हापूसमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत होती.ही भेसळ थांबविण्यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्या.यांनी यावर क्यू आर कोडचा पर्याय आणला आहे.
आंबा कोणाच्या आणि कुठल्या बागेतील आहे हे समजणार
क्यूआर कोड असलेले आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यायचे त्यासाठी शेतक-याला क्यूआर कोड स्टीकर दिला जाईल. स्टीकर विक्रीसाठी पाठवलेल्या हापूसला लावला जाईल. हा क्युआर कोड स्कॅन केल्यावर आंबा कोणता आहे. कोणाच्या बागेतील आहे त्या शेतक-याची संपूर्ण माहिती या क्यूआर कोडमधून समजणार आहे.
ग्राहकांना ओरिजनल हापूस मिळणार
हापूस नावाने इतर जिल्ह्यातील आंबा विकला जायचा यातून शेतकरी आणि ग्राहकांचं देखील मोठं नुकसान होतं. परंतु क्यूआर कोडमुळे ग्राहक आणि शेतकरी यांचा डायरेक्ट संपर्क येणार आहे. त्याशिवाय भेसळ थांबणार आहे आणि ग्राहकांना ओरिजनल हापसूची चव चाखता येणारे आहे.याचा फायदा शेतक-यांना होणार आहे.
प्रायोगित तत्वावर उपक्रम
हापूसला न्याय मिळवून देण्यासाठी कोकणातील शेतकरी एकवटलेत.त्यासाठी रत्नागिरीतील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्या. ही संस्था मदत करतेय. यावर्षी प्रायोगिक तत्वावर हा पँटर्न राबवला जातोय. जवळपास एक लाख स्टीकर्स शेतक-यांना देण्यात आलेत.
कोकणातील शेतकरी आता हायटेक झालाय.गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात थेट ग्राहकांच्या दारापर्यंत शेतकरी आंबा विक्रीसाठी पोहोचला होता यावर्षी देखील तीच परिस्थिती आहे. मात्र यावर्षी थोडा हटके प्रयोग इथल्या शेतक-यांनी केलाय. क्यूआर कोड मुळे ओरिजनल हापूस ग्राहकांना मिळेलच. शेतक-यांना देखील याचा फायदा होईल. परंतु, महत्वाचं म्हणजे हापूसच्या नावावर होणारी भेसळ थांबेल.
संबंधित बातम्या:
यंदाच्या हंगामातली पहिला हापूस आंबा पुणे मार्केटात दाखल, पेटीचा भाव 25 हजार रुपये
( Maharashtra Alphonso producer farmers stick QR Code to Alphonso Mango)