शेती परवडत नाही म्हणता? मग रेशीम शेती करा, लाखो कमाईची हमी, सरकारकडून महारेशीम अभियान, वाचा सविस्तर

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार महारेशीम अभियान सुरु केलं आहे. Maharashtra Government starting Maha Silk campaign

शेती परवडत नाही म्हणता? मग रेशीम शेती करा, लाखो कमाईची हमी, सरकारकडून महारेशीम अभियान, वाचा सविस्तर
रेशीम शेती
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 10:34 AM

मुंबई: ऋतूचक्रात अचानक व अनपेक्षित होणा-या बदलांमुळे पारंपारिक शेतीतून निश्चित उत्पन्नाची हमी देणे कठिण झाले आहे. अशा परिस्थितीत रेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होईल,त्यामुळे शेतक-यांनसमोर रेशीम शेतीचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेत आधुनिक पद्धतीची जोड दिल्यास लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार महारेशीम अभियान सुरु केलं आहे. या अभियानांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महारेशीम अभियान सुरु आहे. राज्यात 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान महारेशीम अभियान राबवलं जात आहे. (Maharashtra Government starting Maha Silk campaign better option for side business with regular agriculture)

शासनाच्या वस्त्रोद्योग व रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत रेशीम शेती बाबत जागृती करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. महारेशीम अभियानासाठी रेशीम शेती माहिती देणारा सुसज्ज रेशीम रथ तयार करण्यात येतो. रेशीम शेती विषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी रेशीम रथा सोबत रेशीम अधिकारी, तज्ञ कर्मचारी विविध गावात जाऊन मार्गदर्शन करतात.

रेशीम उद्योगामध्ये मनरेगा तसेच नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना या दोन योजना आहेत. मनरेगातून 3 वर्षामध्ये एकूण 03 लाख 26 हजार रुपये इतकी रक्कम कुशल-अकुशलच्या स्वरुपात प्रत्येक शेतकऱ्यांना प्रती एकरी दिली जाते. यामध्ये तुती नर्सरी तसेच किटक संगोपनगृह सर्व असून या शेतीपूरक व्यवसायाची नोंद प्रत्येक शेतकऱ्यांना करुन स्वत:चे उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतात.

कोरोना अतिवृष्टीच्या संकटातही रेशीम शेतकरी सावरले

कोरोना सारखी महामारी असताना जवळ जवळ सर्व पिकांचे भाव पडले होते. त्यावेळी शेतकरी चिंतेत होता. पीक काढायच्या वेळी अतिवृष्टी होऊन हातात आलेले पिक वाया गेले. अशावेळी रेशीम शेतकरी मात्र ताठ उभा राहीला. अतिशय हालाखीची परिस्थिती असताना सन 2020-2021 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 40 च्या वर शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगातून दिड लाखाच्यावर उत्पन्न घेत आहेत. तसेच 100 शेतकरी एक लाखाच्या जवळ उत्पन्न घेत असून अजूनही त्यांचे उत्पन्न वाढत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीने आधार दिला असून बरेच शेतकरी उत्पन्न घेऊन समाधान व्यक्त करत आहेत. महारी बु. चे प्रगतशील शेतकरी मेहबुब शेख, बोराळाचे सुनिल मोरे, शिवाजी नायक इत्यादी शेतकऱ्यांनी उत्पन्नाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

हिंगोलीत महारेशीम अभियान

हिंगोली जिल्ह्यात दि. 25 जानेवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत महारेशीम अभियान चालू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी दि. 15 फेब्रुवारी, 2021 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी केले आहे.

रेशीम उद्योगामध्ये रोजगाराची संधी

महाराष्ट्र शासनानं राज्याचं वस्त्रोद्योग धोरण 2018-23 जाहीर केले आहे. त्यांअतर्गत रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम अभियान राबवलं जात आहे. रेशीम उद्योमध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता आहे. महाराष्ट्रतील हवामान रेशीम उद्योगाला पूरक वातावरण असल्यानं महारेशीम अभियान राबवलं जातेय. रेशीम शेतीला प्रोत्साहन आणि प्रसिद्धी आणि प्रचार करण्यासाठी महारेशीम अभियान 2021 सुरु आहे.

रेशीम उद्योगातून इतर फायदे –

1. रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते.

2. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग.

3. तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात.

4. संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.

5. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.

6. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु 3500/- ते 4500/- जास्तीचे उत्पन्न प्रतिवर्षी मिळते.

7. तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.

8. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.

9. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.

संबंधित बातम्या:

कृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी

चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले

Maharashtra Government starting Maha Silk campaign better option for side business with regular agriculture

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.