Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहफुलांवरील निर्बंध हटवले, नाना पटोलेंच्या 20 वर्षांच्या लढ्याला यश, महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

मोहफुलांवर सद्यस्थितीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 या कायद्याअंतर्गत असलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. Nana Patole baccaurea ramiflora

मोहफुलांवरील निर्बंध हटवले, नाना पटोलेंच्या 20 वर्षांच्या लढ्याला यश, महाविकास आघाडी सरकारचा निर्णय
नाना पटोलेंच्या मोह फूल संदर्भातील लढ्याला यश
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 7:19 PM

मुंबई: मोहफुलांवर सद्यस्थितीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 या कायद्याअंतर्गत असलेले निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. हा निर्णय व्हावा यासाठी 1999 पासून आपण संघर्ष करत होतो. आज या प्रदीर्घ लढ्याला यश आले आहे. या निर्णयाचा विदर्भातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. मोह फुलांवरील निर्बंध हटवल्यानं त्यावरील प्रक्रिया उद्योग आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. (Maharashtra Government take back restrictions over collection of baccaurea ramiflora know it use)

आदिवासी बांधवांची पिळवणूक संपुष्टात येणार

या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता मोहफुल गोळा करणे, बाळगणे व राज्यांतर्गत मोहफुलांची वाहतूक करण्यावरील निर्बंध उठवले आहेत. आता यासाठी परवागीचीही आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे यंत्रणेकडून या व्यवसायातील आदिवासी बांधव, गरीब शेतकरी व संस्थांची होणारी पिळवणूक संपुष्टात येईल. तसेच परराज्यात निर्यातीचे धोरण खुले ठेवल्यामुळे मोहफुले गोळा करणा-यांना योग्य दर मिळेल.

गृहविभागाचा शासन निर्णय

आदिवासी विकास विभागालाही मोहफुले वापराकरिता नवीन योजना तयार करण्यात येणार आहेत. या योजनांतर्गत मोहफुलांच्या व्यापाराकरिता एफएफ-2 अनुज्ञप्ती आवश्यक असणार आहे. या अनुज्ञप्ती आदिवासी सदस्य असलेल्या आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था, ग्रामपंचायत अशा प्रकारच्या मुंबई मोहफुले अधिनियम 1950 मधील नियम 2 सी नुसार मान्यताप्राप्त संस्थांना नविन एफएफ-२ परवाने मिळणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णयही आज गृहविभागाने काढला आहे, अशी माहिती नाना पटोले यांच्याकडून देण्यात आली आहे.

गृह विभागाचा मोहफुल संदर्भातील शास निर्णय वाचण्यासाठी क्लिक करा

विदर्भात मोहफूल लागवडीला चालना मिळणार

विदर्भातील वनांसोबत शेतक-यांच्या शेतामध्येही मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे आहेत. त्या शेतक-यांनाही आता उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. मोहफुलं गोळा करणे व व्यापावरील जाचक निर्बंध हटवल्याने विदर्भात मोहफुलांच्या झाडांच्या लागवडीला चालना मिळेल. यातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे रक्षणही होईल. तसेच मोहफुलांवरील प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन जनतेला आर्थिक फायदा होणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. विदर्भासोबत मराठवाड्यातही मोफफूल झाडं पाहायला मिळतात.

मोहफुलाचा वापर कशासाठी होतो?

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोहफूल वेचण्याचं काम केलं जातं. मोह फुलांच्या बिया गोळाकरुन त्यापासून तेलं काढलं जातं. मोहफुलांच्या बियांपासून काढल्या जाणाऱ्या तेलाचा वापर औषधनिर्मिती, साबणाची निर्मिती आणि इंजिन ऑईल म्हणून केला जातो. मोहाच्या झाडाला फुलं येण्याचा काळ हा साधारण पणे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान असतो. तर, यानंतर जूनपर्यंत फुलं येतात. मोहांच्या झाडांच्या मुळांचा वापर अल्सर आजारात प्रभावी आहे. मोहफुलं आयुर्वेदिक दृष्टीनं देखील फार महत्वाची आहेत. यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असल्यानं ती भाजून किंवा वाळवून खातात. फुलांचा रस कफ, अस्थामा आणि चेतासंस्थांच्या आजारावर गुणकारी असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आम्लपित्तावर देखील मोहफुलांचा रस गुणकारी असल्याचं म्हटलं जातं. काही ठिकाणी मोह फुलांपासून दारु देखील काढली जाते.

नाना पटोले यांचं फेसबुक पोस्ट

संबंधित बातम्या

खावटी योजनेच्या वस्तूंची खरेदी नाहीच; आता लाभार्थ्यांना थेट 4 हजार रुपये मिळणार!

नितीन गडकरी नेमकी कोणती रिस्क घेत नाहीत? वाचा ते काय म्हणाले…

(Maharashtra Government take back restrictions over collection of baccaurea ramiflora know it use)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.