Farmers: शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्त लाभ देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Crop Insurance| या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा अधिक फायद मिळणार आहे. गेल्यावर्षी पीक विमा कंपन्यांनी 5800 कोटीपैकी केवळ 900 कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण केले होते.

Farmers: शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्त लाभ देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्याचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 1:07 PM

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांना चाप लावण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून नवे धोरण आखले जात आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप बसून शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले. (Maharashtra government planning to implement cap system for crop insurance companies)

त्यानुसार राज्य सरकार पीक विमा वितरणासाठी नफा आणि तोटा कॅपिंग सिस्टम आणण्याच्या विचारात आहे. त्यासाठी राज्य सरकार नवे धोरण आखत आहे. या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा अधिक फायद मिळणार आहे. गेल्यावर्षी पीक विमा कंपन्यांनी 5800 कोटीपैकी केवळ 900 कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण केले होते. त्यामुळे सरकार विमा कंपन्याच्या मनमानीला चाप लावण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत, 10 दिवसांत नोंदणी करुन लाभ मिळवा

हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. धान्याच्या उत्पादनाऐवजी कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) हा लाभ मिळणार आहे. सध्याच्या घडीला हरियाणात 1,26,928 हेक्टरवर धान्याशिवाय इतर पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. अशा पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. (Good News for farmers will get 7000 rupees annually under mera pani meri virasat scheme in Haryana)

त्यासाठी शेतकऱ्यांना 25 जूनपर्यंत मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या (Mera Pani Meri Virasat Scheme) पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तसेच एग्रो फारेस्ट्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी एका एकरात 400 झाडे लावली असतील तर त्यांना 10 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना आपण किती एकरात पीक घेतले आहेत, ही माहिती नमूद करावी लागेल. या माहितीची पडताळणी केली जाईल. यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. यामध्ये कोणतेही अडथळे येता कामा नये, असे निर्देश सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे झज्जर जिल्ह्यातील ढाकला गावातील शेतकऱ्यांनी यावेळी सामूहिकरित्या धान्याची शेती न करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या:

शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीतील व्यक्तिरेखांची बियाण्यांना नावं, खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी

पारंपारिक शेतीला नवा पर्याय, चिया सीड शेतीतून एका एकरात 6 लाख रुपये कमावण्याची संधी

शेतकऱ्यांना मालामाल बनवेल ‘ही’ औषधी वनस्पती, एका एकरात 4 लाख रुपयांपर्यंत कमाईची संधी

(Maharashtra government planning to implement cap system for crop insurance companies)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.