संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद, बाजारभावात घसरल झाल्याने शेतकरी संतप्त

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे आज सकाळच्या सत्रात 20 ते 30 वाहनातील कांद्याचे लिलाव जाहीर करण्यात आले आहेत. या लिलावात काल बुधवारच्या तुलनेत आज तीनशे चारशे रुपयांची घसरण झाल्याचे लक्षात येताच...

संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद, बाजारभावात घसरल झाल्याने शेतकरी संतप्त
nashik latest newsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 1:51 PM

नाशिक : तेलंगणा राज्यातील हैदराबाद (hydrabad) येथे महाराष्ट्राच्या कांद्याला (maharashtra onion rate) 1800 ते 2000 रुपये बाजार भाव मिळत आहे. दुसरीकडे आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे कांद्याच्या लिलावात (nashik onion rate) दोनशे ते चारशे रुपयेपर्यंत कांद्याला प्रति क्विंटलला बाजार भाव मिळत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एक तासाहून अधिक वेळ कांद्याचे लिलाव बंद पाडत आपला संताप व्यक्त केल्याची घटना घडली.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे आज सकाळच्या सत्रात 20 ते 30 वाहनातील कांद्याचे लिलाव जाहीर करण्यात आले आहेत. या लिलावात काल बुधवारच्या तुलनेत आज तीनशे चारशे रुपयांची घसरण झाल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रशासनाला वेठीस धरले. यावेळी बाजार समितीचे संचालक संदीप दरेकर, छबु जाधव, राजेंद्र बोरगुडे, सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत यांच्यासह लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस राहुल वाघ यांनी मध्यस्थी करत कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांजवळ केली. लिलाव झालेल्या वाहनांचे फेर लिलावात कांद्याचे बाजार भाव न सुधारल्यास आपले आंदोलन सुरू ठेवा. मात्र फेर लिलाव एकदा होऊन द्या, या तोडग्यावर फेर लिलावामध्ये दोनशे रुपये विक्री झालेल्या कांद्याला 300 रुपये तर तीनशे ते चारशे रुपये विक्री झालेल्या कांद्याला कांद्याला पाचशे ते सहाशे रुपये इतका बाजार भाव मिळाला. मात्र संचालक मंडळ कांद्याचे लिलाव सुरळीत करून काढता पाय घेतला असता, कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती नंतर जैसे थे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हे सुद्धा वाचा

लासलगावचे उपबाजार विंचूर येथे कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत कांद्याला 60 ते 70 हजार रुपये एकरी खर्च येत असल्याने आज मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक आणि मजुरी निघत नसल्याची खंत शेतकरी सांगत आहेत. तेलंगणा राज्य सरकारप्रमाणेच राज्य किंवा केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा विक्री झालेल्या कांद्याला एक हजार रुपये लाल कांद्याप्रमाणेच अनुदान द्यावे, नाफेड मार्फत कांद्याची दोन हजार रुपये भावाप्रमाणे हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.