Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकरी आनंदात, पेरणीच्या कामाला वेग येणार
Mansoon Rain Update : आज मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : आज महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस (Maharashtra Rain Update) सुरु झाला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे गारवा आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून पेरणी केलेले शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी खरतर आनंदाची बातमी आहे. उन्हामुळे करपत असलेल्या रोपांना काही प्रमाणात आधार झाला आहे. सध्याचं वातावरण हे महाराष्ट्रात मान्सून (Today maharashtra mumbai rain update) पुढे ढकलण्यास अनुकूल असल्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडं लवकरचं पाऊस सुरु होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
27 तारखेपासून ऑरेंज अलर्ट जारी
कोल्हापूर, नाशिक, सातारा जिल्ह्यात उद्यापासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिन्ही जिल्ह्यात घाट परिसर असल्यामुळे अधिक पावसाची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस तिथं ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 27 तारखेपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून जारी करण्यात आली आहे.
पावसामुळे रोपांना काही प्रमाणात दिलासा
कालपासून नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कारण तिथल्या काही शेतकऱ्यांनी पाणीसाठी शिल्लक असल्यामुळे कपाशीची लागवड केली होती. कडकं उन्हामुळे पीक करपत असल्याचे पाहून शेतकरी मोठ्या चिंतेत होत. कालच्या पावसामुळे रोपांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मुंबईत ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता
आज सकाळी मुंबईतील अनेक भागात रिमझिम पाऊस झाला आहे. त्याचा मुंबईकरांना चांगला फायदा झाला आहे. कारण वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे.
पुणे शहरात सुध्दा सकाळी अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. रिमझिम पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुणे शहरात सगळीकडं ढगाळ वातावरण आहे. महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यास सध्या परिस्थिती अनुकूल आहे.