Sugar production: साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच बाजी, यंदा हंगाम लांबणीवर, काय आहेत कारणे?

गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. राज्यात आजच्या घडीला 10 टक्के ऊस हा फडातच आहे. ही पडती बाजू असली तरी साखर उत्पादनात महाराष्ट्राने आपले पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवलेले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात 250 लाख टन साखरेचे उत्पादन झालेले आहे. यंदा उत्पादन एवढे वाढले आहे की, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनला देखील आपल्या अंदाजपत्रकात बदल करावा लागला आहे. पोषक वातावरण आणि वाढलेले क्षेत्र यामुळे देशातील साखरेचे उत्पादन तर वाढले आहेच पण यंदा हंगामही लांबणीवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sugar production: साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच बाजी, यंदा हंगाम लांबणीवर, काय आहेत कारणे?
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 2:31 PM

पुणे : (Sludge Season) गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. राज्यात आजच्या घडीला 10 टक्के ऊस हा फडातच आहे. ही पडती बाजू असली तरी साखर उत्पादनात (Maharashtra) महाराष्ट्राने आपले पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवलेले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात 250 लाख टन (Sugar Production) साखरेचे उत्पादन झालेले आहे. यंदा उत्पादन एवढे वाढले आहे की, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनला देखील आपल्या अंदाजपत्रकात बदल करावा लागला आहे. पोषक वातावरण आणि वाढलेले क्षेत्र यामुळे देशातील साखरेचे उत्पादन तर वाढले आहेच पण यंदा हंगामही लांबणीवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण गतवर्षी याच कालावधीमध्ये 99 साखऱ कारखान्यांचे गाळप हे बंद झाले होते तर यंदा केवळ 27 साखर कारखाने हे बंद झाले आहेत. 250 लाख टन साखर ही देशात उत्पादित झाली असली तरी राज्यात 97 लाख टनाचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रातच अधिकचे उत्पादन वाढत आहे. एवढेच नाही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असल्याने यंदा साखर आयुक्त यांच्या परवानगीनंतरच कारखान्यांचे गाळप हे बंद होणार आहे.

महाराष्ट्रात 97 लाख टन साखरेचे उत्पादन

देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच महाराष्ट्राने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात 97 लाख टन साखरेचे उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रातून झाले होते. तर आता मार्चमध्ये 100 लाख टन होईल असा अंदाज आहे.इंडियन शुगर मिल्स असोसिएशने यंदा महाराष्ट्रात 126 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वी तर 117 लाख टन होईल असेच सांगण्यात आले होते. पण यंदा विक्रमी असे साखरेचे उत्पादन राज्यातून झाले आहे. तर उत्तरप्रदेशात 68 लाख टन साखर तयार झाली आहे.

हंगाम लांबला तरी प्रश्न मार्गी लागणार का?

यंदा ऊसतोड शिल्ल्क राहिल्याने हंगाम लांबणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. पण असे होऊनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार का? ही मोठी समस्या आहे. कारण फडातील ऊसाचा कार्यकाळ हा संपलेला असल्याने आता वजनात घट होत आहे. शिवाय हंगाम वाढवण्यात आला तरी प्रत्यक्षात ऊसतोड होणार की नाही याबाबत शंका आहे. अधिकचे क्षेत्र असून पावसाळा सुरु होण्यापू्र्वी देखील ऊसाचे गाळप होते की नाही ही शंकाच आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Crop: अखेर शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली, शेतीमालाला योग्य दर अन् आवक वाढली तरी चिंता नाही?

मराठवाड्यातही कृषी पंपाचा वीज प्रश्न पेटला, शेतकऱ्यांना मिळणार का नियमित वीज?

Photo Gallery : होळीची चाहूल देणारा पळस भर उन्हामध्ये भगव्या रंगाने बहरला, काय आहे महत्व?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.