Turmeric : हळद लागवडीत महाराष्ट्र अव्वल..! वाढत्या क्षेत्राला धोका कशाचा?

यंदा हळदीच्या क्षेत्रात 33 हजार हेक्टराने वाढ झाली असली तरी उत्पादनाच्या रुपाने शेतकऱ्यांना किती उत्पादन मिळणार हा प्रश्न आताच उपस्थित झाला आहे. कारण लागवड होताच राज्यात पावसाने थैमान घातले आहे. हळदीच्या क्षेत्रात जागोजागी पाणी साचल्याने कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. निचरा होणाऱ्या शेत जमिनीत हळद लागवड न झाल्यास थेट कंदकुजीचा धोका निर्माण होतो.

Turmeric : हळद लागवडीत महाराष्ट्र अव्वल..! वाढत्या क्षेत्राला धोका कशाचा?
यंदा देशात हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 8:17 PM

सांगली : महाराष्ट्रात (Turmeric Crop) हळदीला योग्य अशी बाजारपेठ तर मिळतच आहे पण काळाच्या ओघात हळद क्षेत्रामध्ये वाढही होत आहे. राज्यात सर्वाधिक हळद लागवड़ आणि उत्पादन हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. यंदा निसर्गाचा लहरीपणा कायम असताना देखील गतवर्षीच्या तुलनेत देशात हळद लागवडीच्या क्षेत्रात 33 हजार हेक्टराने वाढ झाली आहे. (Kharif Season) खरिपात 2 लाख 75 हजार हेक्टरावर हळदीची लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी (Turmeric Area) हळदीचे क्षेत्र हे वाढले आहे. गतवर्षी अधिकचा दर नसतानाही हळदीच्या लागवडीमागचे कारण अद्यापही समोर आले नाही.

क्षेत्र वाढले अन् धोकाही

यंदा हळदीच्या क्षेत्रात 33 हजार हेक्टराने वाढ झाली असली तरी उत्पादनाच्या रुपाने शेतकऱ्यांना किती उत्पादन मिळणार हा प्रश्न आताच उपस्थित झाला आहे. कारण लागवड होताच राज्यात पावसाने थैमान घातले आहे. हळदीच्या क्षेत्रात जागोजागी पाणी साचल्याने कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. निचरा होणाऱ्या शेत जमिनीत हळद लागवड न झाल्यास थेट कंदकुजीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार बुरशीनाशकाचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाड्यात वाढतेय क्षेत्र

महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक क्षेत्रात हळदीचे उत्पादन घेतले जात असले तरी काळाच्या ओघात विदर्भ आणि मराठवाड्यात क्षेत्र वाढत आहे. गतवर्षी राज्यात 84 हजार 66 हेक्टरावर लागवड झाली होती. तर यंदा 1 लाखाहून अधिक क्षेत्र हळदीने व्यापले आहे. हळदीसाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे तर सांगली येथे चांगली बाजारपेठ आहे. त्यामुळे मराठावाड्यातील शेतकऱ्यांना बाजारपेठही जवळ असल्याने क्षेत्रात वाढ होत आहे. सौदर्य प्रसाधनेसाठी येथील हळदीला मागणी आहे. वाढत्या मागणीमुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे.

कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव

राज्यात हळद लागवड करुन अडीच महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे पीक कंद वाढीच्या स्थितीमध्ये आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसामध्ये सातत्य राहिले आहे शिवाय सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. हळद पिकामध्ये पाणी साचून राहिले असल्याने कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.