Weather Report | राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज
कोरोनाच्या काळानंतर अतिवृष्टी झाली होती, त्यातून शेतकरी कुठेतरी सावरताना दिसत होता. पण सध्याच्या खराब हवामानाने त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची पाहायला मिळत आहे.
मुंबई – संपुर्ण महाराष्ट्र (maharashtra) राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather department) व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा चितेंत सापडण्याची शक्यता आहे. कारण आता महाराष्ट्रातील अनेक पीकं काढणीला आली असल्याने शेतक-यांना (farmer)मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची होण्याची देखील शक्यता आहे. पावसाच्या दरम्यान हवेचा वेग वाढणार असून ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विशेष म्हणजे मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. सध्या पाऊस झाल्यास शेतक-यांच्या हातातोंडाला आलेलं पीक जाईल या भीतीखाली अनेक शेतकरी आहेत.
हवामान वेधशाळेने वर्तविलेला अंदाज
- संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता
- मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची शक्यता
- मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय
- महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे
शेतक-यांना चिंता
कोरोनाच्या काळानंतर अतिवृष्टी झाली होती, त्यातून शेतकरी कुठेतरी सावरताना दिसत होता. पण सध्याच्या खराब हवामानाने त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची पाहायला मिळत आहे. सध्या गारपीठीसह महाराष्ट्रात पाऊस झाल्यास गहू, हरभ-यासह अनेक पीकांना त्याचा फटका बसेल. अशा परिस्थितीत शेतक-यांनी जगावं कसं असा प्रश्न नक्कीचं पडला असेल.