Watermelon : मालेगावच्या शेतकऱ्याचा ‘असा’ हा प्रयोग, परदेशी कृषी संशोधकांनीही घेतली दखल

मालेगाव तालुक्यातील दाभाडी भागातील डाळिंब बागांचे क्षेत्र अधिकचे असले तरी शेतकरी हे नवनवीन प्रयोग राबवतातच. येथील महेंद्र निकम यांनी 'सीडलेस हॅप्पी होम'या वाणाच्या कलिंगडचे उत्पादन घेतले आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्ये हे कलिंगड बहरले असून त्यांना अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. तक कलिंगडच्या जोडीला पिवळ्या रंगाचे खरबूजाचेही त्यांनी उत्पादन घेतले आहे.

Watermelon : मालेगावच्या शेतकऱ्याचा 'असा' हा प्रयोग, परदेशी कृषी संशोधकांनीही घेतली दखल
मालेगावातील शेतकऱ्याने खरबूज आणि कलिंगडचे घेतलेले उत्पादन पाहण्याासाठी परदेशी कृषी संशोधक शेती बांधावर दाखल झाले होते.
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 10:49 AM

मालेगाव : शेती व्यवसायात नव नवीन प्रयोग राबवून उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जात आहेत. याला  (Modern Technology)आधुनिक तंत्रज्ञानाचीही जोड मिळत आहे. शिवाय शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयोगही तेवढेच कामी येत आहेत. मध्यंतरी बारामतीच्या शेतकऱ्याने पिवळ्या रंगाचे कलिंगडची मोठी चर्चा राज्यात झाली होती. एवढेच नाही तर या शेतकऱ्याने मुंबई वारी करुन हे कलिंगड जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले होते. आता (Nashik) नाशिकमध्येही अशीच चर्चा रंगली आहे ती (Seedless Watermelon) बिया नसलेल्या टरबूजाची आणि पिवळ्या खरबूजाची. एवढेच नाही तर या हंगामी पिकांची पाहणी करण्यासाठी परदेशातील कृषी संशोधकांनी शेतकऱ्याचे शेत जवळ केले आहे. आता या वाणाच्या हंगामी पिकांचे उत्पादन परदेशातही घेतले जाणार का हे पहावे लागणार आहे.

हॅप्पी होम जातीचे कलिंगड अन् पिवळ्या रंगाचे खरबूज

मालेगाव तालुक्यातील दाभाडी भागातील डाळिंब बागांचे क्षेत्र अधिकचे असले तरी शेतकरी हे नवनवीन प्रयोग राबवतातच. येथील महेंद्र निकम यांनी ‘सीडलेस हॅप्पी होम’या वाणाच्या कलिंगडचे उत्पादन घेतले आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्ये हे कलिंगड बहरले असून त्यांना अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. तक कलिंगडच्या जोडीला पिवळ्या रंगाचे खरबूजाचेही त्यांनी उत्पादन घेतले आहे. आता योग्य दर मिळाला तर विक्रमी उत्पादन पदरी पडेल असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला आहे.

परदेशी कृषी संशोधकांकडून पाहणी

हंगामी फळातील हे वेगळेपण पाहण्यासाठी कृषी संशोधक हे दाखल झाले होते. त्यांनी कलिंगड आणि खऱबूजाबद्दल सर्व माहिती घेतली. शिवाय लागवडीपासून काढणीपर्यंत कसे नियोजन केले जाते. त्याची माहिती या संशोधकांनी घेतली. शिवाय उत्पादनवाढीसाठी कोणते विशेष प्रयत्न केले जातात हे देखील शेतकऱ्यांनी जाणून घेतले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील एक नवा ब्रॅंण्ड नव्याने समोर येत आहे. केवळ या हंगामी पिकांचे वेगळेपण जाणून घेण्यासाठीच कृषी संशोधक हे शेतामध्ये जाखल झाले होते.

उत्पादन वाढीची शेतकऱ्याला अपेक्षा

गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परस्थितीमुळे हंगामी पिकांची उत्पादकता तर कमी झालीच पण दरावरही मोठा परिणाम झाला होता. पण यंदा शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयोग आणि वाढत्या तापमानामुळे कलिंगडला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना सुखवणारा आहे. शिवाय सीडलेस कलिंगडचे विशेष आकर्षण आता ग्राहकांना राहणार आहे. तर दुसरीकडे पिवळ्या खरबूजालाही अपेक्षेपेक्षा चांगली मागणी आणि उत्पादनही असल्याचे शेतकरी निकम यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.