Groundnut : हंगामी पिकांचे उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापनच गरजेचे, कृषी शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांना काय सल्ला ?

शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. गेल्या तीन वर्षापासून अनियमित पाऊस होत असल्याने उत्पादनाची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे शेतकरी हंगामी पिकांचाही आधार घेत आहेत. भुईमूग हा एक उत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर असून लागवडीपासून ते उत्पादन वाढीपर्यंतचे योग्य नियोजन गरजेचे आहे. यावेळी भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरचे निवृत्त शास्त्रज्ञ् डॉ. डी.एम. काळे भुईमूगाच्या वेगवेगळ्या जातीं विषयी सखोल माहिती दिली.

Groundnut : हंगामी पिकांचे उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापनच गरजेचे, कृषी शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांना काय सल्ला ?
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 9:59 AM

पुणे :  (Seasonable Crop) हंगामी पिकाचे उत्पादन वाढीसाठी केवळ नियोजन गरजेचे नाही तर बांधावर योग्य व्यवस्थापन झाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. काळाच्या ओघात शेतकरी हंगामी पिकांवर भर देत आहे. मात्र, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित (Production) उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळही वाया जात आहे, म्हणूनच भुईमूग (Crop Management) पीक व्यवस्थापानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील भोर तालुक्यातील संगमनेर येथे मार्गदर्शन आणि प्रश्न-उत्तरे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, कृषी शास्त्रज्ञ डॉ. डी.एम काळे यांनी मार्गदर्शन केले. भुईमूग लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

मुख्य पिकांचे नुकसान हंगामी पिकांचा पर्याय

शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. गेल्या तीन वर्षापासून अनियमित पाऊस होत असल्याने उत्पादनाची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे शेतकरी हंगामी पिकांचाही आधार घेत आहेत. भुईमूग हा एक उत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर असून लागवडीपासून ते उत्पादन वाढीपर्यंतचे योग्य नियोजन गरजेचे आहे. यावेळी भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरचे निवृत्त शास्त्रज्ञ् डॉ. डी.एम. काळे भुईमूगाच्या वेगवेगळ्या जातीं विषयी सखोल माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांना भुईमूग पिका विषयी असणाऱ्या विविध प्रश्नांवर आणि भुईमूग शेती करताना येणाऱ्या अडचणीं बाबत त्यांनी मार्गदर्शनही करण्यात आले.

रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड

गादी वाफ्यावर जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते. उत्पादनात किमान 50% ने वाढ होते. यामुळे जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलिता ठेवता येते. पिकांना पाण्याचा ताण बसत नाही. शिवाय जास्त पाणी झाल्यास सरीतून पाण्याचा निचरा होण्यासही मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने म्हणजेत पाठाने भुईमूगाची लागवड न करता रुंद सरी वरंबा पध्दतच अवलंब करणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

तुषार सिंचनामुळे वाढते उत्पादन

काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे पिकांना पाणी देण्याच्या पध्दती. भुईमूगाला पाटाने पाणी न देता तुषार सिंचनाचा वापर कऱणे गरजेचे आहे. पाठाद्वारे पाणी देता येते पण त्यासाठी वेगळी रान बांधणी करणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञ् डॉ. डी एम काळे यांनी सांगितले. दरम्यान डॉ काळे यांनी संगमनेर गावातील तरुण प्रयोगशील शेतकरी किरण यादव यांनी एसआरटी पद्धतीचा अवलंब करत घेतलेल्या भुईमूग पिकाच्या शेतीची पाहणी करून, त्यानी केलेल्या एसआरटी प्रयोगाचं कौतुक करून, इतर शेतकऱ्यांनीं सुद्धा एसआरटी म्हणजेचं शून्य मशागत शेतीचा अवलंब करून उप्तादन कसं वाढवावं याबद्दल माहिती दिली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.